बुलटेप्रूफ जॅकेटने नव्हे; तर 'या'मुळे वाचला पोलिसाचा जीव

वृत्तसंस्था
रविवार, 22 डिसेंबर 2019

वरच्या खिशात ठेवले होते वॉलेट

- दिवार चित्रपटाची आठवण

आग्रा : नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) देशभरातून विरोध केला जात आहे. त्यातच फिरोझाबादमध्येही त्याविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर झालेल्या गोळीबारादरम्यान एक गोळी हवालदार विजेंदर कुमार यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटच्या आरपार गेली. पण नाणी असलेल्या वॉलेटमध्ये ती गोळी अडकली आणि विजेंदर यांचा जीव वाचला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए) फिरोझाबादमध्ये मोठे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान विजेंदर कुमार यांच्या गोळी लागली होती. मात्र, बुलटेप्रुफ जॅकेट त्यांनी घातले होते. तसेच त्यांच्या वॉलेटमध्ये असलेल्या वॉलेटमुळे गोळी अडकली. त्यामुळे विजेंदर यांचा जीव वाचला आणि आता त्यांना नवा जन्म मिळाला आहे. 

CAA वर पंतप्रधान मोदी काय बोलणार? संपूर्ण देशाचे लक्ष

वरच्या खिशात ठेवले होते वॉलेट

विजेंदर यांनी आपले वॉलेट जॅकेटच्या वरच्या खिशात ठेवले होते आणि त्या वॉलेटमध्ये नाणे होते. या नाण्यामुळे त्यांना गोळी लागली नाही. 

दिवार चित्रपटाची आठवण

'दिवार' चित्रपटातील एक सीनला शोभेल असाच प्रकार घडला. अमिताभ बच्चन यांच्यावर शत्रूकडून गोळी झाडण्यात येते आणि गोळी अमिताभ यांनी खिशात ठेवलेल्या बिल्ल्याला लागल्याने त्यांचा जीव वाचतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Firozabad Constable Vijendra Kumar Escaped From Death And Saved By Wallet In His Pocket