Free Revadi: सरकारी तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा? म्हणत वरूण गांधीचा मोदींवर निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi

Free Revadi: सरकारी तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा? म्हणत वरूण गांधीचा मोदींवर निशाणा

आपल्याच पक्षाला घरचा आहेर देणारे भाजपचे प्रसिध्द खासदार वरूण गांधी यांनी या वेळेस नरेंद्र मोदी यांच्या 'फ्री की रेवडी' या टिकेला उत्तर दिले आहे. गांधीयांनी ट्विट केले की जे सभागृह गरीबांना 5 किलो रेशन दिल्याबद्दल 'धन्यवाद' ची अपेक्षा करतो. आणि याच सधनात सांगतात की 5 वर्षात 10 लाख भ्रष्टाच्याऱ्यांचे करोडोरूपयांचे कर्ज माफ केले आहे. सरकारी तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा? आसा सवाल त्यांनी केला.

भाजप खासदार वरूण गांधी यांनी भाजपचेच खासदार निशिकांत दुबे यांच्या वर ही जोरदार टिका केली, नरेंद्र मोदीनी एका ,सभेत सांगितल होत की 'फ्री की रेवारी' करणाऱ्यांपासून सावध राहा. या प्रकरणी वरुण गांधी यांनी ट्विट करताना स्वतःच्याच पक्षाला गोत्यात आणले. लिहिले, "जे सदन गरिबांना 5 किलो रेशन दिल्याबद्दल 'धन्यवाद 'म्हणाच्यी अपेक्षा ठेवतात. तेच सदन सांगतात की 5 वर्षात 10 लाख करोडपतींचे करोडोरूपयांचे कर्ज माफ केले आहे.

भाजप खासदार वरुण गांधी यांनी ट्विट केले की, मेहुल चोक्सी आणि ऋषी अग्रवाल यांची नावे फ्रीबीजच्या यादीत अव्वल आहेत. ते पुढे लिहितात की सरकारी पैशावर पहिला अधिकार कोणाचा?

अर्थ राज्यमंत्री कराड यांनी सभागृहात सादर केलेला डेटा वरुण गांधी यांनीही ट्विटमध्ये शेअर केला. त्यात त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की, गेल्या काही वर्षांत सरकारने अब्जाधीशांना कोट्यवधींची कर्जे दिली आणि ते देश सोडून पळून गेले.

Web Title: First Authority Government Treasury Varun Gandhi Target Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..