कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट; आफ्रिकन स्वाईन फ्लूची पहिली केस समोर

वृत्तसंस्था
सोमवार, 4 मे 2020

देशात कोरोनाचे संकट वाढत असतानाच आता आफ्रिकन स्वाईन फ्लूचे संकट आले आहे. आसाम सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आफ्रिकन स्वाईन फ्लूची पहिली केस समोर आली आहे.

गुवाहाटी : देशात कोरोनाचे संकट वाढत असतानाच आता आफ्रिकन स्वाईन फ्लूचे संकट आले आहे. आसाम सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आफ्रिकन स्वाईन फ्लूची पहिली केस समोर आली आहे. यामुळे राज्यातील ३०६ गावांमधील २ हजार ५०० पेक्षा जास्त डुकरांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हा घातक आजार थांबवण्यासाठी केंद्राकडून राज्याला तात्काळ डुकरांना मारण्याची परवानगी आहे, तरी देखील अन्य काही मार्गाने हा आजार थांबवता येईल का, यावर पर्याय शोधणे सुरू असल्याचं आसाम सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्था (एनआयएचएसएडी) भोपाळ यांनी याबाबतीत स्पष्ट केलं आहे की, हा आफ्रिकन स्वाईन फ्लू आहे. तसेच, केंद्राने देखील माहिती दिली आहे की, हे देशातील पहिलं प्रकरण आहे.

४ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह, पत्नीशी व्हॉट्सअ‍ॅपवर झालं अखेरचं बोलणं झालं अन्...

तसेच आसाम सरकारने स्पष्ट केले आहे की, देशातील साथ कोरोनाशी याचं काहीही देणं घेणं नाही. संबंधित विभागाकडून २०१९च्या गणेनुसार आसाम राज्यात डुकरांची संख्या २१ लाख एवढी आहे, आता ती वाढून ३० लाखांपर्यंत आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First Case of African Swine Flu Detected in India 2500 Pigs Killed in Assam