दिल्लीत सापडला Omicron BA.5 चा पहिला रुग्ण

दिल्लीत सापडला Omicron BA.5 चा पहिला रुग्ण
esakal

दिल्लीमध्ये ओमिक्रॉनच्या BA.5 प्रकाराची पहिली काही प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जीनोम सिक्वेन्सिंग डेटाची माहिती असलेल्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी सोमवारी पुष्टी केली. मात्र, हा व्हेरिएंट वेगाने पसरत नाही त्यामुळे काळजी करण्याची गरज नसल्याचे शास्त्रज्ञांनी(First cases of Omicron's BA.5 variant detected in Delhi) म्हटलं आहे.

“एम्स, लोकनायक हॉस्पिटल आणि आयएलबीएसमधून एक किंवा दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. परंतु घाबरून जाण्याची गरज नाही कारण आम्ही अद्याप क्लस्टर पाहिलेले नाहीत. आणि हे विषाणू झापाट्याने पसरत नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

दिल्लीत सापडला Omicron BA.5 चा पहिला रुग्ण
भारतावरील संकट जाता जाईना! देशात 24 तासांत कोरोनाचे 11,793 नवे रुग्ण

दिल्ली सरकारच्या डेटावरून असे दिसून आले की दोन महिन्यांपूर्वी, एप्रिलमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाली असताना, ओमिक्रॉनचे सब-व्हेरिएंट BA.2.12 आणि BA.2.10 रुग्ण आढळले होते.

सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, पहिल्या पंधरवड्यात, दिल्लीत गोळा केलेल्या एकूण नमुन्यांमध्ये BA.2.12 चा वाटा 52% होता आणि BA.2.10 चा वाटा 11% होता.

मे-अखेरपासून, BA.2.38 हा सब-व्हेरिएंट म्हणून उदयास येऊ लागला असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) मधील महामारीविज्ञान आणि संक्रामक रोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. ललित कांत म्हणाले की, BA.5 ची सध्याची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सर्वसमावेशक डेटा मिळाल्यावर योग्य मूल्यांकन केले जाऊ शकते.

दिल्लीत सापडला Omicron BA.5 चा पहिला रुग्ण
आसाममध्ये पूर ओसरू लागला

ओमिक्रॉनचे BA.4 आणि BA.5 सब-व्हेरिएंट हे मागील BA.1 आणि BA.2 प्रकारांपेक्षा सुमारे 13% अधिक प्रसारित करण्यायोग्य आहेत आणि ते हळूहळू युरोप आणि यूएस मध्ये उप-स्ट्रेन बनत आहेत. मात्र, हे व्हेरिएंट कादायक असल्याचा कोणताही पुरावा नाही.

आम्ही तामिळनाडू आणि महाराष्ट्रात BA.4 आणि BA.5 ची प्रकरणे पाहिली असल्याने, दिल्लीतही ही प्रकरणे असण्याची शक्यता आहे. जीनोम सिक्वेन्सिंग ही एक लांब प्रक्रिया असल्याने, आम्हाला कदाचित दोन-तीन आठवड्यांनंतर ट्रेंडची पुष्टी मिळू शकेल. असे डॉ कांत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com