भाजपची गोव्यातील पहिली यादी जाहीर

अवित बगळे
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पणजी - गोव्यात 4 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी 40 पैकी 21 मतदारसंघातील उमेदवारांची नावे भाजपच्या राज्य निवडणूक समितीने निश्‍चित केली. मात्र पेडणे, काणकोण, सावर्डे, मये, कुंभारजुवे आणि केपे या मतदारसंघाबाबतचा निर्णय पहिल्या टप्प्यात घेणे भाजपने टाळले आहे.

पणजी - गोव्यात 4 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी 40 पैकी 21 मतदारसंघातील उमेदवारांची नावे भाजपच्या राज्य निवडणूक समितीने निश्‍चित केली. मात्र पेडणे, काणकोण, सावर्डे, मये, कुंभारजुवे आणि केपे या मतदारसंघाबाबतचा निर्णय पहिल्या टप्प्यात घेणे भाजपने टाळले आहे.

पहिल्या यादीतील संभाव्य उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ दिल्लीत घेणार आहे. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पक्षाच्या कार्यालयात आज झाली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली. पेडणे मतदारसंघाचे सध्या पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर प्रतिनिधीत्व करतात, काणकोणचे रमेश तवडकर हे क्रीडामंत्री, मयेचे अनंत शेट हे विधानसभेचे सभापती आहेत. या तिघांची उमेदवारी पहिल्या टप्प्यात जाहीर करणे भाजपने टाळले आहे.

कॉंग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेले पांडुरंग मडकईकर (कुंभारजुवे मतदारसंघ) यांची उमेदवारीही पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेली नाही याउलट कॉंग्रेसमधून आमदारकी सोडून आलेल्या माविन गुदिन्होंची उमेदवारी मात्र दाबोळी मतदारसंघातून पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आली आहे.
सावर्डे मतदारसंघात सध्या गणेश गावकर आमदार आहेत. तेथून निवडणूक लढविण्यास प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर इच्छूक आहेत. त्यामुळे मयेचे अनंत शेट यांना प्रदेशाध्यक्ष करून तेंडुलकर यांना सावर्डेची उमेदवारी देण्यात येण्याची शक्‍यता आहे. गावकर हे आदिवासी समाजाचे आहेत. त्यांना उमेदवारी नाकारून केपे मतदारसंघातून त्याच समाजाचे माजी मंत्री प्रकाश वेळीप यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. काणकोणातून माजी आमदार विजय पै खोत यांच्या नावाचा विचार भाजपने चालवला आहे.

भाजपच्या राज्य निवडणूक समितीने उमेदवारीसाठी शिफारस केलेले उमेदवार मतदारसंघवार असे -

 • मांद्रे - लक्ष्मीकांत पार्सेकर (मुख्यमंत्री)
 • हळदोणे - ग्लेन टिकलो (आमदार)
 • थिवी - किरण कांदोळकर (आमदार)
 • म्हापसा- ऍड फ्रांसिस डिसोझा (उपमुख्यमंत्री)
 • शिवोली - दयानंद मांद्रेकर (जलसंपदामंत्री)
 • कळंगुट - मायकल लोबो (आमदार)
 • साळगाव - दिलीप परुळेकर (पर्यटनमंत्री)
 • पणजी- सिद्धार्थ कुंकळकर (आमदार)
 • ताळगाव - दत्तप्रसाद नाईक
 • साखळी - प्रमोद सावंत (आमदार)
 • डिचोली- राजेश पाटणेकर
 • शिरोडा - मदाहेव नाईक (उद्योगमंत्री)
 • सांगे - सुभाष फळदेसाई (आमदार)
 • कुडचडे - आर्थुर डिसिल्वा
 • वास्को - कार्लुस आल्मेदा (आमदार)
 • दाबोळी - माविन गुदिन्हो(कॉंग्रेसचे माजी आमदार)
 • मुरगाव - मिलींद नाईक ( वीजमंत्री)
 • कुठ्ठाळी - एलिना साल्ढाना (ग्रामीण विकासमंत्री)

 

Web Title: First list of BJP declared in Goa