बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ७१ जागांसाठी उद्या मतदान

वृत्तसंस्था
Tuesday, 27 October 2020

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाली. १६ जिल्ह्यांमधील ७१ जागांसाठी बुधवारी (ता.२८) मतदान होईल. आठ मंत्र्यांसमवेत अनेक दिग्गजांचे भवितव्य उद्या मतदान पेटीत बंदिस्त होणार आहे. 

पाटणा - पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाली. १६ जिल्ह्यांमधील ७१ जागांसाठी बुधवारी (ता.२८) मतदान होईल. आठ मंत्र्यांसमवेत अनेक दिग्गजांचे भवितव्य उद्या मतदान पेटीत बंदिस्त होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिल्या टप्प्यात शिक्षण मंत्री कृष्णनंदन प्रसाद वर्मा हे जहानाबाद मतदारसंघातून उभे आहेत. कृषी मंत्री प्रेम कुमार, ग्रामीण कार्य मंत्री शैलेश कुमार, विज्ञान मंत्री जय कुमारसिंह, महसूल मंत्री  रामनारायण मंडल, कामगार मंत्री विजय कुमार सिन्हा, खणीकर्म मंत्री बृजकिशोर बिंद, परिवहन मंत्री संतोष कुमार निराला आदी मंत्री रिंगणात आहे. याशिवाय हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम)चे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी हेही रिंगणात आहेत. भारतीय नेमबाज व भाजपची उमेदवार श्रेयसीसिंह, काँग्रेसचे नेते  अनंतसिंह, लोकजनशक्तीचे राजेंद्रसिंह, भगवानसिंह कुशवाह हेही मैदानात आहे. 

अमेरिकन हॉटेलनं हाकललं; अनन्या बिर्लांनी शेअर केला वर्णद्वेषाचा अनुभव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first phase of Bihar assembly elections in 71 constituencies tomorrow to vote