esakal | दिलासादायक! पाटना एम्सच्या कोरोना लसीचा पहिला टप्पा यशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

aiims

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रसारास रोखण्यासाठी बऱ्याच ठिकाणी कोरोनावरील लशींवर संशोधन सुरु आहे. यादरम्यानच आता पाटनाच्या एम्समधून एक खुशखबर आली आहे. 

दिलासादायक! पाटना एम्सच्या कोरोना लसीचा पहिला टप्पा यशस्वी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रसारास रोखण्यासाठी बऱ्याच ठिकाणी कोरोनावरील लशींवर संशोधन सुरु आहे. यादरम्यानच आता पाटनाच्या एम्समधून एक खुशखबर आली आहे. इथली कोरोना लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे.  पाटणा येथील 44 लोकांसह संपूर्ण बिहारमधील 350 लोकांवर कोरोना लसीची चाचणी घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात या लसीचे डोस 350 जणांना दिले आहेत. ज्याचा कोणावरही दुष्परिणाम झालेला नाही. आता त्याचा अहवालही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. या यशस्वी चाचणीनंतर पाटणा एम्समध्ये दुसर्‍या टप्प्यासाठी 50 जणांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 
एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीएम सिंह यांनी सांगितले आहे की, दुसर्‍या टप्प्यातील लसीचे डोस 50 लोकांना देण्यात येणार आहे. ज्यांना या दुसऱ्या टप्प्याच्या चाचणीत भाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी पटना एम्सने एक मोबाइल नंबर 9471408832 जारी केला आहे. त्यावर कॉल करून लोक भाग घेऊ शकतात. 15 जुलैपासून एम्स पटना येथे सुरू झालेल्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांच्या यशानंतर आता दुसर्‍या टप्प्यात 12 वर्षाच्या मुलांपासून ते 65 वर्षांच्या लोकांवर चाचण्या सुरू होणार आहेत.

हे वाचा - महाराष्ट्रातील स्थिती अद्याप चिंताजनक

पहिल्या टप्प्यात 18 ते 55 वर्षे वयोगटातील लोकांवर चाचणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये या लसीचे कोणतेही दुष्परिणाम आढळले नाहीत. त्याचे सकारात्मक निकाल समोर आल्यानंतर औषध महासंचालकांनी चाचणीच्या दुसऱया टप्प्यास परवानगी दिली आहे. एम्सचे अधीक्षक डॉ. सीएम सिंह म्हणाले की, पटना एम्समध्ये 15 जुलैला कोरोना लसीच्या 5 मिलीग्रॅमचा पहिला डोस देण्यात त्यानंतर त्या व्यक्तीला 29 जुलैला दुसरा डोस देण्यात आला होता.

हे वाचा - देशात कोरोनाचा कहर थांबता थांबेना; आतापर्यंत महाराष्ट्रात दगावले सर्वाधिक रुग्ण

या लसीच्या डोसानंतर 12 आणि 26 ऑगस्ट रोजी लस रोग प्रतिकारशक्ती चाचणी घेण्यात आली, त्यानंतर त्या लोकांमध्ये अँटीबॉडीजचा वाढ आढळली. पहिल्या टप्प्यातील दुसरा डोस 14 दिवसांनी देण्यात आला होता, परंतु आता दुसऱ्या टप्प्यातील दुसरा डोस 28 व्या दिवशी दिला जाईल, अशी माहिती एम्सचे अधीक्षक डॉ. सीएम सिंह यांनी दिली आहे.