esakal | महाराष्ट्रातील स्थिती अद्याप चिंताजनक
sakal

बोलून बातमी शोधा

Face-Mask

मास्क न वापरणे, रस्त्यावर थुंकणे यांसारख्या सवयींचा लोकांनी त्वरित त्याग करावा व विशेषतः चाचण्या करून घेण्याची टाळाटाळ करू नये, अन्यथा फार उशीर होईल, असा इशारा आरोग्य मंत्रालयाने आज दिला. महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांतच देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ६२ टक्के रुग्ण व ७० टक्के मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले. त्यातही महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत तब्बल २६.८५ टक्के व आंध्र प्रदेशात ११.०८ टक्के रुग्ण आढळत आहेत.

महाराष्ट्रातील स्थिती अद्याप चिंताजनक

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - मास्क न वापरणे, रस्त्यावर थुंकणे यांसारख्या सवयींचा लोकांनी त्वरित त्याग करावा व विशेषतः चाचण्या करून घेण्याची टाळाटाळ करू नये, अन्यथा फार उशीर होईल, असा इशारा आरोग्य मंत्रालयाने आज दिला. महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांतच देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ६२ टक्के रुग्ण व ७० टक्के मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले. त्यातही महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत तब्बल २६.८५ टक्के व आंध्र प्रदेशात ११.०८ टक्के रुग्ण आढळत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सामाजिक अंतरभान न पाळता गर्दी करणे यासारखे विषय यंत्रणेसाठी चिंताजनक ठरत असल्याचेही सरकारने मतप्रदर्शन केले. भारतात बरे होणाऱ्यांची संख्या ३३ लाखांच्याही पुढे गेल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. कोरोना चाचण्यांपासून पळू नये वा त्या करून घेण्यास घाबरूही नये असे आवाहन आयसीएमआरतर्फे करण्यात आले. चाचण्यांसाठी प्रिस्क्रिप्शनची अट केंद्राकडून काढून टाकल्याचे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी अधोरेखित केले.

शाळेची घंटा 21 सप्टेंबरपासून वाजणार, केंद्र सरकारने नियमावलीसह दिले आदेश

नव्याने रुग्ण आढळण्याचे प्रमाण २.१५ वरून १.७ टक्‍क्‍यांवर आले आहे व तो एक टक्‍क्‍यांच्याही खाली आणण्याचे प्रयत्न आहेत. अनेक राज्यांनी कोरोना नियंत्रित करण्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मात्र महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व कर्नाटक या ५ राज्यांतच देशातील ६२ टक्के रूग्ण व ७० टक्के मृत्यू होत आहेत, असेही भूषण म्हणाले. 

चिनी सैनिकांच्या कुरापतीचा पुरावा; भाला आणि रायफल घेऊन घुसखोरी करत असल्याचं उघड

  • देशातील सक्रिय रुग्ण - ८ लाख ८३ हजार 
  • बरे झालेले - ३३ लाख २३ हजार 
  • प्रति १० लाख लोकसंख्येमागे मृत्यू - ५३ 
  • प्रगत देशांत १० लाखांमागे मृत्यू - ५००-६००

रशियालाही हवी लस 
‘कोविड १९’च्या साथीवर भारतात ज्या तीन लशींच्या चाचण्या प्रगतिपथावर आहेत, त्याबाबत रशियानेही भारताशी सहकार्य करून काही मदत मागितल्याचे डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. ते म्हणाले, की भारतीय लसीचे उत्पादन व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा अभ्यास करण्यासाठी रशियाने मदत मागितली आहे. रशियाच्या ‘स्पुटनिक’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या भारतासह पाच देशांत सुरू होतील, असेही ते म्हणाले.

Edited By - Prashant Patil