First School For Dalit's : महात्मा फुलेंनी अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत काढली होती पहिली शाळा

त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध असे पण ज्योतिबा खंबीरपणे उभे होते.
First School For Dalit's
First School For Dalit's esakal

First School For Dalit's : महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तवेळ पहिल्यांदा रोवली गेली १८४८ मध्ये, जेव्हा पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरु झाली. या मुलींना शिकवण्याची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवण्यात आली होती. १८५२ मध्ये महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली. ही शाळा पुण्याच्या वेताळपेठेत काढण्यात आली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध असे पण ज्योतिबा खंबीरपणे उभे होते.

समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते.

समाजात अस्पृश्यांना वेगळी वागणूक दिली जायची. त्यांना इतरांमध्ये मोकळेपणाने मिसळण्याचीसुद्धा मुभा नव्हती. अशात फुलेंनी सुरू केलेल्या शाळेमुळे त्यांच्यासाठी शिक्षणाचं एक नवं व्यासपीठ उभं राहिलं. त्यांनासुद्धा शिक्षणाची संधी मिळाली. (Mahatma Phule)

First School For Dalit's
Mahatma Phule Jayanti : जोतीबांचे विचार कृतीने प्रत्यक्षात करुन दाखविले ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी

त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात. (School)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com