
नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे गेले दिड महिना दिल्लीतच अडकलेल्या आणि मोठ्या अडचणी सहन करणाऱ्या १४०० पेक्षा जास्त मराठी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी कोरोना काळातील देशातील पहिली विद्यार्थी स्पेशल रेल्वेगाडी दिल्लीहून उद्या (ता.१६ मे) दुपारी ४ वाजता सुटणार आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जुनी दिल्ली रेल्वे स्थानकावरून निघाल्यावर ही गाडी महाराष्ट्रातील भुसावळ, नाशिक, कल्याण आणि पुणे स्थानकांवर थांबेल आणि तेथून हे विद्यार्थी आपापल्या गावी परततील. उद्या सकाळी ८ पासून राज्यात परतणाऱ्या १४०८ विद्यार्थ्यांचे वैद्यकीय स्क्रीनिंग होणार आहे. सरकारने नवी दिल्लीतील ११ जिल्ह्यांमध्ये १४ केंद्रे निश्चित केली आहेत. करोल बाग, राजेंद्र प्लेस, राजेंद्र नगर, पटेलनगर भागात राहतात. त्यांच्यासाठी गोल मार्केट आणि आंबेडकर स्टेडियम या दोन केंद्रांवर आठपासून पुढे वैद्यकीय स्क्रीनिंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या विशेष रेल्वेगाडीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना त्यानी टायझर आणि मास्क याच्यासह नाश्ताही देण्यात येणार आहे. ती पाकिटे तयार करण्याचे काम डॉ शिंदे यांच्या मीनाबागेतील निवासस्थानी कालची संपूर्ण रात्र आणि आज दिवसभर सुरू होते.
लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे गाड्या सोडणे सुरू केले. मात्र फक्त विद्यार्थ्यांसाठी सोडण्यात येणारी ही पहिलीच आणि बहुतेक एकमेव रेल्वेगाडी असेल. यासाठी प्रयत्न करणारे राजेश बोरनारे यांनी १४०८ विद्यार्थ्यांची यादी महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीतील निवासी आयुक्त केंद्राकडे दिली होती. त्यात काल आणखी ६३विद्यार्थ्यांचा समावेश झाला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या एका वेळच्या जेवणाची व्यवस्था राज्य सरकार तर दुसऱ्या वेळेच्या जेवणाची व्यवस्था रेल्वेतर्फे करण्यात करणार असल्याचे सांगण्यात आले.
अडचणींचा डोंगर
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीत आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी गेला दीड महिना अतिशय अडचणी सहन करून काढला. त्यांच्याकडील पैसे संपले. अनेकांना घरमालकांनी त्रास दिला.
विद्यार्थी स्पेशल रेल्वे गाडीचा प्रवास
१६ मे - दुपारी ४ : जुनी दिल्ली रेल्वे स्थानकावरून सुटणार.
१७ मे - सकाळी ७.१५ : भुसावळ
१०.४५ : नाशिक
१.१० : कल्याण
सायंकाळी ४.३० ते ५ पुणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.