esakal | लॉकडाउन 4.0 : जाणून घ्या कोणत्या राज्यात काय प्लॅनिंग सुरुय...
sakal

बोलून बातमी शोधा

 lockdown 4,  states planning

देशातील सध्याच्या परिस्थिती पाहता देशवासियांना आणखी काही दिवस घरातच बसून रहावे लागणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना दिले आहेत. विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, 18 मे पासून नव्या स्वरुपात लॉकडाउनची बजावणी करावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. अनेक राज्यात याची तयारी देखील सुरु झाली आहे.

लॉकडाउन 4.0 : जाणून घ्या कोणत्या राज्यात काय प्लॅनिंग सुरुय...

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : चीनच्या वुहानमधून जगभरात वेगाने संक्रमण होत असलेल्या कोरोना विषाणूने भारताची गतीही मंदावली आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाउन सारखा कठोर निर्णय घेण्याची नामुष्की ओढावली आहे. देशातील सध्याच्या परिस्थिती पाहता देशवासियांना आणखी काही दिवस घरातच बसून रहावे लागणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना दिले आहेत. विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, 18 मे पासून नव्या स्वरुपात लॉकडाउनची बजावणी करावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. अनेक राज्यात याची तयारी देखील सुरु झाली आहे.

मल्ल्याची शेवटची याचिकाही ब्रिटन हायकोर्टाने फेटाळली; महिनाभरात भारताच्या ताब्यात?

तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनचा कालवधी संपल्यानंतर नव्या स्वरुपातील निर्बंध कशापद्धतीने असतील, याकडे देशवासियांच्या नजरा खिळल्या आहेत. तत्पर्वी अनेक राज्यांनी यासंदर्भातील रणनिती आखण्यास सुरुवात देखील केली आहे. जाणून घेऊयात कोणत्या राज्यात काय सुरुय याबद्दलचा थोडक्यात आढावा... 

चौथ्या टप्प्यात पूर्वीपेक्षा अन्य काही बाबतीत अधिक सूट देऊन वातावरण पूर्ववत करण्याच्या उद्देशाने सकारात्मक पावले उचलली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक वाहतूक सुरळीत करण्याचा निर्णय घेऊन देशवासियांना मोठा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असेल. ठराविक ठिकाणी देशांतर्गत विमान सेवा आणि रस्ते वाहतूकीत ढिल दिली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.  

कोरोना व्हायरस कधीच संपणार नाही : जागतिक आरोग्य संघटना

आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि दिल्ली सरकारने अर्थिक घडामोडी सुरळीत करण्याच्या उद्देशाने यासंबंधीत क्षेत्राला शिथीलता मिळावी, अशी सूचना केली आहे. आध्र प्रदेशमधील सरकारने  नॉन-कंन्टेटमेंट झोनमधील आर्थिक आणि सामाजिक घडामोडी सुरळीत करण्यावर भर दिला आहे.  
केरळमध्ये सर्वाधिक उत्पन्न हे पर्यटनाच्या माध्यमातून होते. त्यामुळे  मेट्रो सेवा, लोकल ट्रेन, घरेलू फ्लाइट, रेस्टॉरेंट आणि होटल्स पुन्हा खुले करण्यासाठी केरळ सरकार उत्सुक आहे. राज्यास कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. याठिकाणी आतापर्यंत  560 कोरोनाग्रस्त आढळले होते. त्यापैकी 500 रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत. केरळमध्ये चार जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. 

बऱ्याच आठवड्यापासून बंद असलेली हॉटेल, रेस्टोरंट, व्यायामशाळा तसेच सार्वजनकि ठिकाणे खुली करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती कर्नाटक सरकारकडून करण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये आतापर्यंत  959 कोरोनाग्रस्त आढळले असून गृहमत्रालयाच्या आकडेवारीनुसार, याठिकाणी 1,518 लोक विलगीकरण कक्षात आहेत. याठिकाणी मागील आठवड्यात पब आणि बार तसेच मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली होती.  

सोशल डिस्टन्सिंगच उल्लंघन केल्यावर साफ करावं लागणार टॉयलेट 

तमिलनाडू सरकारने कंटेंटमेंट झोन वगळता अन्य परिसरातील व्यापार-उद्योग सुरु करण्याची सूचना केंद्र सरकारला केली आहे. मागील काही दिवसांत याठिणी कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वेगाने वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे याठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊनच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्याची राजधानी असलेल्या चेन्नईतील भाजी मंडईत जवळपास 2,600 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. राज्यात 4,623 लोक क्वारंटाईन आहेत.