Women Life : पृथ्वीवरील सर्वांत उंच युद्धभूमीवर प्रथमच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती

याशिवाय हे सैन्यदल चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरही लक्ष ठेवते. त्यात सियाचीन ग्लेशियर देखील आहे.
Women Life
Women Lifegoogle

मुंबई : दरवर्षी मोठ्या संख्येने देशातील मुली भारताच्या रक्षणासाठी भारतीय सैन्यात सामील होतात. कॅप्टन शिवा चौहान अशीच एक मुलगी आहे जिने इतिहास रचला आहे. फायर अँड फ्युरी सॅपर्सच्या कॅप्टन शिवा चौहान कुमार या पदावर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

फायर अँड फ्युरी कॉर्प्स ही भारतीय लष्कराची एक तुकडी आहे. हा लष्कराच्या उधमपूरस्थित नॉर्दन कमांडचा एक भाग आहे. 14 कॉर्प्स कारगिल आणि लेहच्या परिसरात लष्करी तैनाती पाहते. याशिवाय हे सैन्यदल चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरही लक्ष ठेवते. त्यात सियाचीन ग्लेशियर देखील आहे. (Captain Shiva Chauhan)

Women Life
Savitribai Phule : फक्त शिक्षणच दिलं नाही तर, सावित्रीबाईंनी ही कामंही केली

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात सुमारे अडीच वर्षांपूर्वी २० जवान हुतात्मा झाल्यानंतरही चिनी सैनिकांना धूळ चारणारे शूर सैनिक या फायर अँड फ्युरी कॉर्प्सशी संबंधित आहेत. या कॉर्प्सच्या नावावरूनच त्यांच्या शौर्याची झलक मिळते. आग म्हणजे 'अग्नी' आणि क्रोध म्हणजे 'उग्र'.

कठोर प्रशिक्षण पूर्ण केले

भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने ट्विटमध्ये सांगितले आहे की, 'फायर अँड फ्युरी सॅपर्सचे कॅप्टन शिवा चौहान यांनी कठोर प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

त्यानंतर सर्वोच्च युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरच्या कुमार पोस्टवर कार्यरत असलेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत. कॅप्टन शिवा चौहान 15632 फूट उंचीवर असलेल्या कुमार पोस्टवर तैनात आहेत.

यासोबतच एका पोस्टवर 10 आर्मी ऑफिसर देखील आहेत, ज्यापैकी एक कॅप्टन शिवा आहे आणि या फोटोमध्ये भारताचा ध्वज तिरंगा आहे. सियाचीन ग्लेशियर ही पृथ्वीवरील सर्वात उंच युद्धभूमी आहे तिथे भारत आणि पाकिस्तानमध्ये 1984 पासून अनेक लढाया झाल्या आहेत.

Women Life
Women Life : मुलींच्या शर्टाची बटणे डाव्या बाजूलाच का असतात ?

मुलींसाठी प्रेरणा

एवढेच नाही तर देशातील सर्व जनता कॅप्टन शिवा यांच्याकडे मुलींसाठी प्रेरणा म्हणून पाहत आहे. उणे ३० अंश सेल्सिअस तापमानात कॅप्टन शिवा चौहान या ठिकाणी तैनात आहेत आणि जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करत आहेत.

त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन भारतातील सर्व कन्या आपले भविष्य उज्वल करू शकतात आणि देशाचा नावलौकिक मिळवू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com