अरबी समुद्रातून २६४ मच्छिमारांची सुटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

अरबी समुद्रात अडकलेल्या २६४ मच्छीमारांची तटरक्षक दलाने सुटका केली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे सध्या समुद्र खवळलेला आहे. हे मच्छीमार ३ डिसेंबरला समुद्रात अडकले होते. सुटकेचं हे थरारनाट्य अजूनही सुरूच आहे. तटरक्षक दलाच्या समुद्र प्रहार, समर, सावित्रीबाई फुले, अमल, अपूर्व या नौका रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आहेत.

मुंबई : अरबी समुद्रात अडकलेल्या २६४ मच्छीमारांची तटरक्षक दलाने सुटका केली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे सध्या समुद्र खवळलेला आहे. हे मच्छीमार ३ डिसेंबरला समुद्रात अडकले होते. सुटकेचं हे थरारनाट्य अजूनही सुरूच आहे. तटरक्षक दलाच्या समुद्र प्रहार, समर, सावित्रीबाई फुले, अमल, अपूर्व या नौका रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आहेत. तटरक्षक दलाची डॉर्निअर टेहळणी विमानंही तैनात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दरम्यान, गेले तीन दिवस हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या किनारपट्टीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात मच्छिमारांच्या बोटी अडकल्या आहेत. याबद्दलची माहिती तामिळनाडूमधील मच्छिमार संघटनांकडून भारतीय तटरक्षक दलाला मिळाली. पश्चिम गोव्यापासून २५० नॉटिकल मैल अंतरावर मच्छिमार बोटी अडकल्या होत्या. तटरक्षक दलानं तातडीनं मदतकार्य सुरू करत सर्व मच्छिमारांची सुखरुप सुटका केली.

खराब हवामानामुळे ५० मच्छिमार बोटी समुद्रात अडकल्याची माहिती ३ डिसेंबरला भारतीय तटरक्षक दलाला मिळाली. भरसमुद्रात अडकलेल्या मच्छिमारांना तातडीनं मदत देणं गरजेचं असल्यानं तटरक्षक दलानं या भागात असणाऱ्या सात व्यापारी जहाजांशी संपर्क साधत त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली.

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रावादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन

या जहाजांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे अडकलेल्या मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला. यानंतर लगेचच तटरक्षक दलाच्या बोटी मच्छिमारांच्या सुटकेसाठी रवाना झाल्या. भारतीय व्यापारी जहाज नवधेनू पूर्णानं ८६ मच्छिमारांची सुटका केली. तर जपानच्या एम व्ही तोवाडा जहाजानं ३४ मच्छिमारांची सुटका केली. भारतीय तटरक्षक दलाच्या विनंतीवरुन मॅरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटरनं या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

मॅरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटरच्या सूचनेवरुन आणखी पाच व्यापारी जहाजं या अभियानात सहभागी झाली. त्यामुळे २६४ मच्छिमारांची सुटका झाली.मच्छिमारांची सुटका केल्यानंतर त्यांना खाद्यपदार्थ आणि प्रथमोपचार देण्यात आले. सु

टका करण्यात आलेल्या सर्व मच्छिमारांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलानं दिली आहे. तटरक्षक दलाच्या समुद्र प्रहरी, समर, सावित्रीबाई फुले, अमल आणि अपूर्वा या जहाजांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. याशिवाय तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टरदेखील या मोहिमेत सहभागी झालं होतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fishermens stuck in sea