अल्पवयीन मुलांनी पॉर्न पाहून केला सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जुलै 2018

डेहराडून (उत्तराखंड): मोबाईलवर पाच अल्पवयीन मुलांनी पॉर्न पाहून आठ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सर्व मुले नऊ ते 14 वयोगटातील असून, त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच अल्पवयीन मुलांनी मोबाईलवर पॉर्न पाहिले. यानंतर एका घराबाहेर खेळत असलेल्या आठ वर्षाच्या मुलीवर त्यांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना शहरातील सहसपूर भागात घडली. या मुलांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

'बलात्कार करण्यापूर्वी ही मुले काही दिवसांपासून पॉर्न पहात होती. पीडित मुलीच्या घरी कोणी नसल्याचे त्यांना माहित होते. यामुळे त्यांनी नियोजन करून सामूहिक बलात्कार केला', असे बलात्कार करणाऱया मुलांनी पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले.

Web Title: Five boys between 9 & 14 rape 8yr old after watching porn