पाच टक्के माजी सैनिक 'ओआरओपी'पासून वंचित - मनोहर पर्रीकर

पीटीआय
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

पणजी - 'वन रॅंक, वन पेन्शन' (ओआरओपी) योजनेचा लाभ 95 टक्के माजी सैनिकांना मिळाला आहे. पाच टक्के माजी सैनिकांना "ओआरओपी'चा लाभ मिळालेला नाही, अशी कबुली संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज दिली. ज्यांना "ओआरओपी'चा लाभ मिळालेला नाही, अशा माजी सैनिकांना पुढीन दोन महिन्यांत तो देण्यात येईल, असे पर्रीकर म्हणाले.

"ओआरओपी'च्या मुद्द्यावरून हरियानातील माजी सैनिकाने आत्महत्या केल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर पर्रीकरांनी वरील विधान केले आहे. ते पुढे म्हणाले, की "ओआरओपी' योजनेचा 95 टक्के माजी सैनिकांना लाभला मिळाला असून, पाच टक्के माजी सैनिक त्यापासून वंचित आहेत. पाच टक्के माजी सैनिकांना "ओआरओपी'चा लाभ मिळण्यात अडचणी असून, त्या पुढील दोन महिन्यांत दूर केल्या जातील. 1962 आणि 1971 च्या युद्धात सहभागी झालेल्या मुख्यत्वे जुन्या माजी सैनिकांची माहिती अद्याप सापडत नसल्यामुळे त्यांना "ओआरओपी'चा लाभ मिळू शकलेला नाही.

राजकारणात प्रवेश केलेले माजी सैनिक राजकारण्यांप्रमाणेच सरकारवर आरोप करत आहेत, अशी टीकाही पर्रीकर यांनी या वेळी केली.

Web Title: Five per cent of the ex-soldiers orop from disadvantaged