
Wife Files Complaint as IPS Pooran Kumar’s Cremation Still Pending
Esakal
हरियाणातील आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांच्या आत्महत्येला पाच दिवस झालेत. अद्याप त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. वाय पूरन कुमार यांच्या कुटुंबियांनी शवविच्छेदनासाठी परवानगी दिलेली नाही. मंगळवारी आयपीएस वाय पूरन कुमार यांनी गोळी झाडून घेत स्वत:ला संपवलं होतं. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी डीजीपी सागर प्रीत हुड्डा आणि आयजी पुष्पेंद्र कुमार पोहोचले होते. कुटुंबाच्या परवानगीनंतरच शवविच्छेदन होईल. शवविच्छेदनाच्या आधी पार्थिव कुटुंबियांना दाखवण्यात येईल.