नक्षलवाद्यांचा पुन्हा हल्ला; छत्तीसगडमध्ये पाच ठार 

Five dead in Naxal Attak in poll bound Chhatisgarh
Five dead in Naxal Attak in poll bound Chhatisgarh

रायपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला केला. सीआयएसएफच्या जवानांना घेऊन चाललेल्या बसवर नक्षलवाद्यांनी आज (गुरुवार) बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात चार नागरिक, एक जवान मृत्युमुखी पडले. याशिवाय, सात जण गंभीर जखमी झाले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या (शुक्रवार) दंतेवाडा भागात निवडणुकीसाठी जाहीर सभा आहे. बस्तरमधील जगदालपूर येथे मोदी यांची सभा आहे. बस्तरमध्ये 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 

बस्तर भागातील दंतेवाडा या भागात नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. सीआयएसएफचे जवान बाजारपेठेत दैनंदिन खरेदीसाठी गेले होते. तेथून कॅम्पमध्ये परतत असताना हा हल्ला झाला. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेला हा स्फोट इतका शक्तिशाली होता, की त्यात त्या बसचे दोन तुकडे झाले. बसमधील जवान दूरवर फेकले गेले. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दंतेवादा हा नक्षलग्रस्त भाग आहे. तसेच, राज्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने या भागातील सुरक्षा दलांना सुरक्षिततेविषयी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, या घटनेमध्ये यापैकी काही सूचनांचे पालन झाले नसल्याचे संकेत दंतेवाडाचे पोलिस महानिरीक्षक डॉ. अभिषेक पल्लव यांनी सांगितले. 

येत्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बस्तर भागात झालेला हा तिसरा मोठा हल्ला आहे. काही दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी बिजापूर येथे सीआरपीएफचा एक बंकर उध्वस्त केला होता. त्यानंतर गस्ती पथकावरही नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात चार जवान आणि 'दूरदर्शन'चा एक पत्रकार ठार झाला होता. 

दरम्यान, आजच्या हल्ल्यानंतर पोलिसांनी तातडीने अतिरिक्त कुमक रवाना केली आहे. शिवाय, जंगलामध्येही छापे घालण्याचे सत्र सुरू केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com