फक्त 40 रुपयांसाठी मित्रांनी आपल्याच दोस्ताची केली हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

उधम सिंह नगरमध्ये अवघ्या 40 रुपयांसाठी 5 मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या केलीय.

फक्त 40 रुपयांसाठी मित्रांनी आपल्याच दोस्ताची केली हत्या

उत्तराखंडमधील (Uttarakhand) उधम सिंह नगरमध्ये अवघ्या 40 रुपयांसाठी 5 मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या केलीय. हे सर्वजण कचरा वेचण्याचं काम करायचे. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून तीन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस (Police) त्यांचा शोध घेत आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेलं हत्यार जप्त केलंय. सद्दाम असं मृत तरुणाचं नाव आहे. 40 रुपयांच्या रद्दीच्या वादातून तरुणाचा खून झाल्याचा खुलासा पोलिसांनी केलाय. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी मृत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतलाय. यासोबतच पोलिसांनी हत्येत वापरलेला चाकू आणि वीटही जप्त केलीय.

हेही वाचा: ASI च्या संरक्षणाखाली 'कुलूपबंद' मंदिरं पूजेसाठी होणार खुली

एसएसपीनं (SSP) सांगितलं की, 18 मेच्या रात्री मृत सद्दाम आणि नवाब यांच्यात रद्दीच्या पैशावरून वाद झाला होता. वाद वाढत गेल्यानं नवाबनं त्याची महिला मित्र आणि अन्य तीन साथीदारांसह सद्दामला मारहाण करून त्याचा गळा दाबून खून केला. यानंतर आरोपींनी चाकू आणि विटांनी मृत तरुणाच्या चेहऱ्यावर ठेचून त्याचा मृतदेह महामार्गाच्या कडेला असलेल्या जंगलात फेकून दिल्याचं त्यांनी सांगितलं. अटक करण्यात आलेले आरोपी अंमली पदार्थांचे व्यसनी आहेत. तीन फरार आरोपींचा शोध सुरूय.

Web Title: Five Friends Killed Their Own Friend For 40 Rupees Udham Singh Nagar Uttarakhand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :UttarakhandCrime News
go to top