Accident : गावी परतणाऱ्या कुटुंबांवर काळाचा घाला; पिकअप-ट्रकच्या धडकेत पाच जण जागीच ठार, 12 प्रवासी जखमी

हिसारजवळील राजगड इथं रात्री उशिरा पिकअपची ट्रकला जोरदार धडक बसली. हा अपघात खूप भीषण होता.
Pickup Truck Accident
Pickup Truck Accidentesakal
Summary

नीलगायीला वाचवण्याच्या नादात गाडीवरचा ताबा सुटला आणि कार ट्रकला जावून धडकली, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे.

हिसार : शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हिसारजवळील राजगड (Hisar Rajgad) इथं सालासरहून परतणाऱ्या पिकअप वाहनाची ट्रकला (Pickup Truck Accident) जोरदार धडक बसली.

या पिकअपमध्ये दोन कुटुंबातील 17 जण होते. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

हिसारजवळील राजगड इथं रात्री उशिरा पिकअपची ट्रकला जोरदार धडक बसली. हा अपघात खूप भीषण होता. ट्रकला धडकल्यामुळं वाहन रस्त्याच्या कडेला उलटलं, त्यामुळं पिकअपमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना हिसार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Pickup Truck Accident
Karnataka Election : भाजपला पराभवाची भीती? Exit Poll जाहीर होताच कर्नाटकात मोदींच्या तब्बल 20 सभा!

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बिमला (वय 60), तिची मेहुणी कृष्णा (50), अंकित (10) आणि 2 वर्षांची सृष्टी अशी मृतांची नावं आहेत. जखमींमध्ये कविता (41), ओमपती (60), परवीन (27), सुनीता (30), पूजा (13), आंचल (14), प्रीती (15) व अर्णब, मनीषा, मंजू सोनू (आडनाव समजू शकले नाही) आदी जखमी झाले आहेत.

Pickup Truck Accident
Haridwar Court : RSS ला कौरव म्हणणं राहुल गांधींना भोवणार; कार्यकर्त्यानं दाखल केला मानहानीचा खटला

मिळालेल्या माहितीनुसार, स्याहदवा गावातील 17 जण पिकअपमधून सालासरला गेले होते. शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या गावी परतत होते. दरम्यान, राजस्थानमधील हरियाणा सीमेजवळील राजगढ बायपासवर एका ट्रकला धडक दिली. नीलगायीला वाचवण्याच्या नादात गाडीवरचा ताबा सुटला आणि कार ट्रकला जावून धडकली, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com