esakal | VIDEO: नवरदेवाला भरमांडवात आईनेच मारलं चपलेनं; कारण ऐकून व्हाल हैराण
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO: नवरदेवाला भरमांडवात आईनेच मारलं चपलेनं; कारण ऐकून व्हाल हैराण

VIDEO: नवरदेवाला भरमांडवात आईनेच मारलं चपलेनं; कारण ऐकून व्हाल हैराण

sakal_logo
By
विनायक होगाडे

लखनऊ : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. आपलं आयुष्य दुसऱ्या एका व्यक्तीसोबत बांधलं जाण्याच्या हा दिवस असल्याने प्रत्येकालाच त्या सोहळ्याचा प्रत्येक क्षण आणि क्षण अनुभवायचा असतो. मात्र, काहीवेळा या खास क्षणी सुद्धा मोठा घोळ होताना पहायला मिळतो. असाच एक घोळ उत्तर प्रदेशातील हामीरपूरमध्ये पहायला मिळाला आहे. एका लग्नात नवऱ्या मुलाच्या आईने नवऱ्या मुलास चपलाने मारहाण केली आहे. तेही नवऱ्या मुलीस वरमाला घालत असतानाच हा प्रकार घडला आहे. या साऱ्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हेही वाचा: राणे, शिंदेसह 43 मंत्र्यांनी पदभार स्वीकारला; पाहा फोटो

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की वर आणि वधु दोघेही एकमेकांना वरमाला घालत आहेत. यावेळीच नवऱ्या मुलाची आई स्टेजवर येते, ती फोटोग्राफरला बाजूला सारते, स्वत:चं चप्पल काढून चक्क स्वत:चा मुलगा असणाऱ्या नवऱ्या मुलास मारायला सुरुवात करते. या आईने आपला चेहरा दुपट्ट्याने झाकला होता. पिवळा टी-शर्ट घातलेला एक माणूस त्यांना स्टेजवरुन खाली खेचताना पहायला मिळतोय. या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

हेही वाचा: ट्विटरची पुन्हा टाळाटाळ; कोर्टाकडे मागितला आणखी वेळ

आपल्याच मुलाच्या लग्नात एखादी आई मुलाला स्टेजवर जाऊन चपलेने मारहाण का करेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असणारच. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मुलीसोबत नवरदेवाचं लग्न सुरु होतं ती मुलगी दुसऱ्या जातीतील असल्याकारणाने त्या आईने आपल्याच मुलास मारहाण केली आहे. कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध त्याने हे पाऊल उचलल्याकारणाने संतप्त झालेल्या या आईने हे कृत्य केलंय.

कोर्टात नोंदणी पद्धतीने विवाह सोहळा पार पडल्यानंतर पारंपारिंक पद्धतीने विवाह घडवून आणण्याचा निर्णय मुलीच्या वडीलांनी घेतला. मात्र, या सोहळ्याला मुलाकडच्या मंडळींचा विरोध असल्याकारणाने त्यांनी त्यांना या सोहळ्यास आमंत्रण दिलं नाही. मात्र, तरीही या नवरदेवाची आई विवाहस्थळी पोहोचली आमि तिने स्टेजवर चढून आपल्याच मुलाला चपलाने मारहाण केलीय. तिथे उपस्थित असलेल्या इतर मंडळींनी या संतप्त आईला सावरण्याचा प्रयत्न केला.

loading image