Wetlands : आणखी पाच पाणथळ क्षेत्रे जागतिक यादीत; भूपेंद्र यादव यांची माहिती

रामसर परिषदेअंतर्गत आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पाणथळ क्षेत्रांच्या जागतिक यादीत भारतातील आणखी पाच अशा क्षेत्रांचा समावेश झाला आहे.
Wetlands
Wetlandssakal

नवी दिल्ली - रामसर परिषदेअंतर्गत आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पाणथळ क्षेत्रांच्या जागतिक यादीत भारतातील आणखी पाच अशा क्षेत्रांचा समावेश झाला आहे. त्यामुळे, या यादीत समाविष्ट झालेल्या देशातील एकूण पाणथळ क्षेत्रांची संख्या आता ८० वर गेली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी आज ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टद्वारे दिली.

यात कर्नाटकमधील मागडी केरे संवर्धन राखीव क्षेत्र, अनकासमुद्र पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र आणि अघनाशिनी नदीमुख तसेच तमिळनाडूतील कराईवेत्ती पक्षी अभयारण्य आणि लाँगवूड शोला अभयारण्य या पाच पाणथळ क्षेत्रांचा समावेश आहे.

यासंदर्भात माहिती देताना यादव म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनावर भर दिल्याने भारताचा पाणथळ क्षेत्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पंतप्रधान मोदी यांची संकल्पना असलेल्या ‘अमृत धारोहर’ उपक्रमातदेखील याचे प्रतिबिंब उमटले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

एक्स वरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, की पाच क्षेत्रांची शक्ती; पाणथळ क्षेत्रावरील परिषदेचे सरचिटणीस डॉ. मुसोंडा मुंबा यांची आज भेट घेतली. जागतिक पाणथळ क्षेत्र दिनाला दोन दिवस राहीले असताना भारताने रामसर यादीतील आपल्या पाणथळ क्षेत्रांची संख्या ७५ वरून ८० वर नेली.

जगभरातील पाणथळ क्षेत्रांचे जाळे विकसित करून त्यांचे संवर्धन करणे, हा या यादीचा प्रमुख उद्देश आहे. जागतिक जैवविविधतेचे संवर्धन तसेच मानवी अस्तित्वाच्या शाश्वततेसाठी ही पाणथळ क्षेत्रे महत्त्वाची समजली जातात.

रामसर परिषद काय आहे?

इराणमधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पाणथळ क्षेत्रांचे संवर्धन व सुयोग्य वापरासाठी आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला. जगातील प्रमुख पाणथळ क्षेत्रांचा रामसर यादीत समावेश करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com