सिलेंडरच्या स्फोटात पाच जणांचा बळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

मंडी : हिमाचल प्रदेशातील मंडी शहरात सोमवार (ता.23) सकाळी गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 5 रहिवाशांच्या होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची महिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून, नागरिकांना इमारतीमधून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या आगीत अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही आग एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे लागल्याची शक्यता मंडीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव कुमार यांनी वर्तवली आहे. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही कुमार म्हणाले.

सिलेंडरचा स्फोट इतका मोठा होता, की यामुळे आजूबाचूच्या इमारतींनाही हादरे बसले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आणि खबरदारी म्हणून त्यांनाही बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. 

Web Title: Five people killed in cylinder blast