कुपवाडा जिल्ह्यात हिमस्खलन; 5 जवान बेपत्ता

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये लष्कराच्या तळावर हिमस्खलन झाले. यामध्ये पाच जवान अडकल्याची शक्यता असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

जम्मू - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये लष्कराच्या तळावर हिमस्खलन झाले असून, 5 जवान बेपत्ता आहेत.

लष्कराचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये लष्कराच्या तळावर हिमस्खलन झाले. यामध्ये पाच जवान अडकल्याची शक्यता असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. 56 राष्ट्रीय रायफल्सच्या तळावर हिमस्खलन झाले. आज पहाटे ही घटना घडली.

नुकतेच गुरेझ सेक्टरमध्ये लष्कराच्या तळावर हिमस्खलन झाले होते. यामध्ये 14 जवान हुतात्मा झाले होते. बंदिपुरा येथेही झालेल्या हिमस्खलनात चार जणांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Five soldiers trapped after hit by avalanche in Kupwara

टॅग्स