पाचही राज्यांमध्ये लसीकरण वाढवा; निवडणूक आयोगाचे आदेश

लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
vaccination
vaccinationesakal

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीची (Election) रणधुमाळी सुरू असलेल्या पाचही राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने (Election Commission) संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. आयोगाने याआधीही अशाच प्रकारचे निर्देश राज्यांना दिले होते.

विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांतील कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून सरकारने बायोमेट्रिक उपस्थितीला ३१ जानेवारीपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कार्मिक कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी सांगितले.

vaccination
पुणे : महापालिका सोमवारपासून सुरु करणार गुंठेवारीची नोंदणी

दिवसभर

  • छत्तीसगडमध्ये निर्बंध कठोर करण्याचे निर्देश

  • लसीकरणामुळे गोवा बंदरावर दोन हजार लोक अडकले

  • प्रियांका गांधी यांच्या नातेवाईकाला कोरोना

  • दिल्लीत चोवीस तासांमध्ये चार हजार बाधितांची नोंद

  • बिहारमध्ये जनता दरबारातील १०० डॉक्टरांना संसर्ग

  • मुंबई- गोवा क्रूझवरील ६६ जणांना कोरोनाचा संसर्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com