एटीसीच्या परवानगीशिवाय विमानाने भरली उड्डाण; आता होणार चौकशी| Flight filled without permission | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Flight filled without permission

एटीसीच्या परवानगीशिवाय विमानाने भरली उड्डाण; आता होणार चौकशी

गुजरातमधील राजकोट येथून एटीसीच्या परवानगीशिवाय ३० डिसेंबर रोजी विमानाने दिल्लीला उड्डाण (Flight filled without permission) केले. स्पाइसजेटचे हे विमान होते. आता डीजीसीएने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश (There will be an inquiry now) दिले आहे. राजकोट विमानतळ प्राधिकरणाचा हवाला देत एएनआयने सांगितले की, विमानाच्या वैमानिकांनी राजकोट एटीसीकडून उड्डाणासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या नव्हत्या. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि डीजीसीए यांना सविस्तर अहवाल पाठवण्यात आला आहे. (Flight filled with aircraft without ATC permission)

फ्लाइट क्रमांक एसजी-३७०३ ने वेळेवर दिल्लीसाठी उड्डाण केले. एटीसीच्या आता लक्षात आले आहे की वैमानिकांनी उड्डाण करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेतल्या नाहीत. विमानाने उड्डाण केल्यानंतर राजकोट एटीसीने वैमानिकांना परवानगीशिवाय कसे टेक ऑफ केले, असे विचारले. यावर वैमानिकांनी चूक मान्य करीत माफी मागितली. एटीसी आणि वैमानिकांमध्ये हे संभाषण टेक ऑफनंतर झाले.

हेही वाचा: सैनिक पती ड्युटीवर जाताच पत्नीची आत्महत्या; चॅटिंगने घेतला जीव

या निष्काळजीपणामागे कम्युनिकेशन गॅप, काही चूक किंवा अन्य काही कारण होते का, याचा तपास केला जाईल. एका वृत्तपत्रानुसार, प्रत्यक्षात काय घडले आणि त्यामागे कोण आहे हे पाहिले जाईल, असे एका पायलटने सांगितले. मानक ऑपरेशन प्रक्रियेनुसार एटीसीकडून टेकऑफ परवानगी घेणे आवश्यक आहे. दरम्यान एटीसी धावपट्टी पूर्णपणे रिकामी आहे की नाही याची खात्री करते. तसेच इतर कोणतेही विमान आपत्कालीन परिस्थितीत टेक ऑफ किंवा लँडिंग करीत नाही का, याची खात्री केल्याशिवाय परवानगी देत नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top