श्रीनगरमध्ये हिमवर्षाव सुरूच;विमानसेवा विस्कळीत

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 7 January 2021

जवाहर बोगद्याच्या परिसरात चार फुटांपर्यंत बर्फ साचल्याने वाहतूक सुरू होऊ शकली नाही. दरम्यान, जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बर्फ बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

श्रीनगर - काश्‍मीरमध्ये सलग चौथ्या दिवशी हिमवृष्टी सुरू असल्याने विमान सेवा स्थगित करण्यात आली असून जम्मू-श्रीनगर महामार्गही बंद ठेवण्यात आला आहे. जवाहर बोगद्याच्या परिसरात चार फुटांपर्यंत बर्फ साचल्याने वाहतूक सुरू होऊ शकली नाही. दरम्यान, जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बर्फ बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जवाहर बोगद्याजवळ बर्फ असल्याने जम्मू-श्रीनगर महामार्ग आजही बंद ठेवण्यात आला. तसेच समरोली, मगरकोट, पंथयाल, मारोग, कॅफेटेरिया मोर, धलवास, नशरी येथेही भूस्खलन झाल्याने वाहतूक सुरळीत करण्यात अडथळे येत आहेत. यामुळे सुमारे ४५०० वाहने अडकून पडली असून त्यात बहुतांश वाहने मालवाहतूक करणारी आहेत. हिमवृष्टीमुळे आज दिवसभरात सुमारे १० ते १२ उड्डाणे रद्द केल्याचे श्रीनगर विमानतळ अधिकाऱ्याने सांगितले. तत्पूर्वी हिमवर्षावामुळे ३,४ आणि ५ जानेवारीला विमान सेवा स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, काश्‍मीर खोऱ्यातील जनजीवन आजही विस्कळीत राहिले. सततच्या हिमवृष्टीमुळे काही घरांची हानीही झाल्याचे वृत्त आहे. श्रीनगर येथे गेल्या चोवीस तासात ३४.७ सेंटीमीटर बर्फ पडला. तसेच काझीगुंद येथे ३३.७ सेंटीमीर हिमवृष्टी झाल्याची नोंद झाली. पहेलगाम येथेही नव्याने हिमवृष्टी झाली असून तेथे २९ सेंटीमीटर तर कोकेनर्ग येथे १७ सेंटीमीटर हिमवृष्टी झाली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काश्‍मीरमध्ये ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
उत्तर काश्‍मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात त्रेहगाम येथे एका ७४ वर्षाच्या महिलेचा छत कोसळल्याने मृत्यू झाला. राणी बेगम असे मृत महिलेचे नाव असून घरावर बर्फ पडल्याने छत कोसळले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हिमवृष्टीमुळे वीज पुरवठ्यावर परिणाम
अनेक भागातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड
जम्मू-श्रीनगर महामार्ग चौथ्या दिवशीही बंद
श्रीनगरची विमान सेवाही विस्कळीत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flight was suspended for the fourth day in a row due to snowfall in Kashmir