फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Flipkart Warehouse Theft : या घटनेनंतर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. गोदामात नेमकं काय घडलं, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
Flipkart warehouse theft

Flipkart warehouse theft

esakal

Updated on: 

पंजाबमधील बठिंडा येथे चोरट्यांनी फ्लिपकार्टच्या गोदामाला लक्ष्य करत कोट्यवधी रुपयांच्या मोबाईलवर हात साफ केला आहे. भुच्चो कैंचियां रोडवरील गोदामातून तब्बल ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला गेले असून, त्यांची किंमत सुमारे ४.५८ कोटी रुपये आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. गोदामात नेमकं काय घडलं, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. कंपनीचे इन्फोर्समेंट ऑफिसर हरजिंदर कुमार यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com