सोनिया गांधींचा पीएमओ मध्ये किती हस्तक्षेप होता?; संरक्षणमंत्र्यांचा पलटवार

Flogging a dead horse Nirmala Sitharaman tells Lok Sabha on Rafale
Flogging a dead horse Nirmala Sitharaman tells Lok Sabha on Rafale

नवी दिल्ली : राफेल व्यवहार प्रकरणी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यातून पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री सितारमन यांच्यावर राफेल हा गैरव्यवहार केल्याची तोफ डागली. या आरोपाला उत्तर देत सितारमन यांनी लोकसभेत काँग्रेसवरच पलटवार केलेत.

राफेल व्यवहाराविषयी इंग्रजी दैनिक 'द हिंदु'ने दिलेल्या बातमीला नाकारत सितारमन म्हणाल्या की, 'हे जुन्या गोष्टीं उखरुन काढण्यासारखे आहे.' राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मोदींवर निशाणा साधला. 30 हजार कोटीचा राफेल व्यवहार झालेले दस्ताऐवज त्यांनी दाखविले. ज्यात, नरेंद्र मोदी यांनी व्यवहारात हस्तक्षेप केला आहे, हे स्पष्ट लिहीले असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसभेत सितारमन म्हणाल्या की, 'काँग्रेस मृत घोड्याला पळवत आहेत. विरोधी पक्ष बहुराष्ट्रीय कंपनी व स्वार्थ यांच्या नादात जुन्या गोष्टी उखरुन काढत आहेत. वायु सेनेला अजून कसे मजबूत करता येईल या गोष्टीत त्यांना काहीही रस नाही.' 

पुढे त्या म्हणाल्या, 'पीएमओ तर्फे एखाद्या विषयाच्या माहितीचा पाठपुरावा करत राहणे म्हणजे हस्तक्षेप नसतो. सोनिया गांधी या राष्ट्रीय सल्लागार समिती च्या अध्यक्ष असताना त्यांचा पीएमओ मध्ये किती हस्तक्षेप असायचा ? राष्ट्रीय सल्लागार समितीचा पीएमओवर प्रचंड प्रभाव होता.'

मिडीया रिपोर्टबाबत सितारमन म्हणाल्या, 'कोणत्याही राष्ट्रीय पातळीवरील रिपोर्ट छापताना त्यांनी तत्त्व पाळायला पाहिजे होती. जर त्या वृत्तपत्राला खरे पुढे आणण्याची ईच्छा होती तर तेव्हाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचाही कोट त्यांनी बातमीत घ्यायला पाहीजे होता. पर्रिकर यांनी या विषयी बोलताना म्हटले होते की काळजी करायची काही गरज नाही आणि सगळी कामे नीट होत आहेत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com