‘सह्याद्री’च्या मदतीला ‘दिल्ली’ धावली

नवी दिल्ली - दिल्लीतील विविध संस्था आणि मंडळे यांनी २५ लाख रुपयांची मदत केली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतील विविध संस्था आणि मंडळे यांनी २५ लाख रुपयांची मदत केली आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्रावर कोसळलेल्या अस्मानी संकटांचा सामना करणाऱ्या पूरग्रस्तांसाठी दिल्लीतील विविध संस्था आणि मंडळे यांनी २५ लाख रुपयांची मदत केली असून, ही मदत उद्या (ता. १५) विशेष रेल्वेगाडीद्वारे पूरग्रस्तांपर्यंत पोचविण्यात येईल.

या मदतीत विविध उपयोगी साहित्य आणि रोख १८ लाख रुपयांचा समावेश आहे. पूरग्रस्तांना मदतीचा हा पहिला टप्पा असून, यापुढेही दिल्लीतून मदत जमा करण्याचे काम सुरू असेल, अशी माहिती दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे यांनी दिली. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना दिल्लीत स्थायिक मराठी बांधवांनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. दिल्लीत मदत निधीची संकलन केंद्रे उघडण्यात आली. या केंद्रांवर आजपर्यंत २५ लाखांचा मदत निधी आणि साहित्य जमा झाले. दिल्लीतल्या अनेक गणेश मंडळांनी गणेशोत्सवातील खर्चात कपात करून तो मदत निधी पूरग्रस्तांसाठी दिला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या लोधी इस्टेट भागातील निवासस्थानी ही मदत एकत्रित करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com