Flood Safety Tips : पूराच्या आधी अन् नंतर तुमच्या कुटुंबाची अशी करा सुरक्षा, या सूचना कायम लक्षात ठेवा

तुमच्या राहत्या ठिकाणी पूरस्थिती उद्भवण्यापूर्वीपासूनच या काही सूचना लक्षात घेतल्या पाहिजे
Flood Safety Tips
Flood Safety Tipsesakal

Heavy Rain : पावसाने राज्यात धुमाकूळ घातला असून धो-धो पडणाऱ्या पावसाने अनेक शेतकऱ्यांची पिके आणि अनेकांची राहती घरंसुद्धा वाहून गेली. चंद्रपूरमध्ये गोदावरी नदीने रूद्ररूप धारण केलं असून अनेकांना त्यांच्या राहत्या जागेवरून हलवण्यात आलंय. महाराष्ट्रातील सगळी धरणं हाऊसफुल्ल झाली आहेत. अशा परिस्थितीत तुमच्या राहत्या ठिकाणी पूरस्थिती उद्भवण्यापूर्वीपासूनच या काही सूचना लक्षात घेतल्या पाहिजे.

पूरग्रस्त ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी आधीच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वनियोजन करून ठेवावे. एक अशी योजना तयार करा ज्यात घराबाहेर बैठकीचे ठिकाण, तसेच पूरक्षेत्रातून बाहेर पडण्याचा मार्ग आणि पुराच्या पाण्यापासून दूर राहण्याचा समावेश असेल.

आपल्या मालमत्तेचे रक्षण करा. तुमच्या सर्व मालमत्तेची माहिती असलेली वैयक्तिक फ्लड फाइल तयार करा आणि ती सुरक्षित ठिकाणी ठेवा, जसे की सेफ डिपॉझिट बॉक्स किंवा वॉटरप्रूफ कंटेनर. या फाइलमध्ये तुमच्या विमा पॉलिसींची एक प्रत, घरगुती यादी आणि इतर सर्व गंभीर कागदपत्रांच्या प्रती असाव्यात.

सावध राहण्यासाठी आपत्कालीन पुरवठा किट तयार करा. आपत्कालीन पुरवठा किट तयार करा ज्यामध्ये अन्न, बाटलीबंद पाणी, प्रथमोपचार पुरवठा, औषधे आणि बॅटरीवर चालणारा रेडिओ यांचा समावेश असावा.

जर तुमच्या आजूबाजूच्या भागात पूर आला असेल तर...

• माहितीसाठी रेडिओ किंवा टीव्ही ऐका.

• अतिवृष्टीमुळे पूर येऊ शकतो हे लक्षात ठेवा. पावसामुळे पूर येण्याची शक्यता असल्यास उंचावर जाऊन थांबा. त्यासाठी कोणाच्याही सूचनेची वाट पाहू नका.

• प्रवाह, ड्रेनेज चॅनेल, कॅन्यन आणि पूराचा धोका असणाऱ्या प्रदेशांमध्ये सावधान राहा. अशा भागांमध्ये कोणत्याही पुर्व इशाऱ्याशिवाय पूर येऊ शकतो.

Flood Safety Tips
Flood Safety Tips

तुम्ही घराबाहेर पडण्याची तयारी करत असाल तर...

• आपले घर सुरक्षित ठेवा. हातात वेळ असेल तर बाहेरचे फर्निचर आत आणून ठेवा. महत्त्वाच्या वस्तू वरच्या मजल्यावर हलवा.

• तुम्हाला सूचना मिळाली असेल तर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मुख्य स्विचेस आणि वॉल्व बंद करा. सर्व विद्युत उपकरणे बंद करुन ठेवा. तुम्ही पाण्यात असाल किंवा ओले झाले असाल तर विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका.

पूरामुळे घर सोडावे लागल्यास, या गोष्टी लक्षात ठेवा...

• वाहत्या पाण्यात चालू नका. प्रवाहाची सहा इंचापेक्षा जास्त असेल तर तुमचा तोल जाऊ शकतो. प्रवाही नसणाऱ्या पाण्यात तुम्ही चालू शकता. जमिनीवर पाय घट्ट ठेवण्यासाठी जमिनीची तपासणी करण्यासाठी एखादी काठी सोबत ठेवा.

• पूर आलेल्या भागांमध्ये जाऊ नका. जर तुमची गाडी पाण्याखाली जाणार असेल तर ती तशीच राहू द्या आणि तुम्ही सुरक्षित स्थळी धाव घ्या. पाण्याच्या प्रवाहात तुम्ही आणि तुमचे वाहन वेगाने वाहून जाऊ शकते.

प्रत्यक्ष पूरस्थिती उद्भवल्यास...

1. सरकारी आज्ञेचे पालन करा आणि अधिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा.

2. सुरक्षित ठिकाणी रहा आणि योग्य ती माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा.

3. विद्युत पुरवठा बंद करा आणि उघड्या तारांना स्पर्श करु नका.

4. अफवांमुळे घाबरुन जाऊ नका आणि स्वतःही अफवा पसरवू नका.

Flood Safety Tips
Dam Water Level : राज्यातील धरणांत ५५ टक्के साठा; शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता दूर

पूरस्थितीत काय करावे काय करू नये, इथे वाचा

1. विद्युत आणि गॅस उपकरणे व मुख्य स्विचेस बंद करा.

2. आपात्कालीन किट सोबत ठेवा आणि तुमचे मित्र आणि कुटुंबीयांना तुम्ही कोठे जात आहात हे कळवा.

3. पूराच्या पाण्याशी संपर्क टाळा. हे पाणी मल, तेल, रसायने किंवा इतर पदार्थांमुळे दूषित असू शकते.

4. तुम्हाला जर पाण्यात उभे राहायचे असेल तर खांब किंवा काठीचा वापर करा. पाण्याची खोली तसेच ड्रेनेजचे खड्डे आणि नाले तपासा.

5. विजेच्या तारांपासून लांब रहा कारण पाणी हे विद्युतप्रवाहाचे वाहक आहे. वीज कंपन्यांकडे खाली पडलेल्या विजेच्या तारांविषयी तक्रार करा.

6. पूराचे पाणी ओसरलेल्या जमिनीवरुन चालताना काळजी घ्या. ढिगाऱ्याखालील जमिनी व फरशांवर फुटलेल्या काचा, अणकुचीदार वस्तू, खिळे इत्यादी वस्तू असू शकतात. चिखल आणि गाळ साचलेल्या जमिनीवरुन पाय घसरण्याची भीती असते.

7. अद्ययावत माहिती व बातम्या मिळविण्यासाठी रेडिओ किंवा टेलिव्हिजन ऐका.

8. इमारतीचे छत ओले झाले असेल तर वीज बंद करा. जिथून पाणी गळत असेल तेथे खाली बादली ठेवा आणि छताला लहानसे छिद्र पाडा जेणेकरुन त्यावरील भार थोडा कमी होईल.

9. खोलीतील पाणी काढून टाकण्यासाठी बादल्या, स्वच्छ टॉवेल्स आणि कपड्यांचा वापर करा.

10. फर्निचर आणि ओल्या कार्पेटमध्ये अॅल्युमिनियम फॉइल शीट ठेवा. (Security)

Flood Safety Tips
Heavy Flood: हे देश सध्या धोकादायक पूरस्थितीचा सामना करत आहेत

हे करु नका...

1. वाहत्या पाण्यातून चालू नका. त्यामुळे तुमचा पाय घसरण्याची भीती आहे.

2. वाहत्या पाण्यामध्ये पोहू नका. यादरम्यान वाहून जाण्याची किंवा एखाद्या वस्तूला धडकण्याची दाट शक्यता असते.

3. पूरग्रस्त भागातून वाहने नेऊ नका. तुम्हाला त्या परिसरातील अडथळ्यांचा अंदाज येणार नाही. तसेच अवघ्या अर्धा मीटर पाण्यात वाहने वाहून जाण्याची दाट शक्यता असते. तसेच पूरग्रस्त भागातून वाहने चालवताना आजूबाजूच्या मालमत्तेचे नुकसान होऊ शकते.

4. पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले कोणतेही अन्न खाऊ नका.

5. एखाद्या एक्सपर्टेने तपासणी केल्याशिवाय वीजेचा वापर सुरु करु नका. गॅस गळतीबाबत सावध रहा. मेणबत्त्या, कंदील किंवा कसलीही ज्योत पेटवू नका.

6. वस्तूंवरील चिखल घासण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे मालमत्तेचे आणखी नुकसान होऊ शकते. (Flood)

7. छत ओले असताना त्याला जोडलेली उपकरणे वापरु नका.

8. ओल्या फरशीवर उभे राहून टीव्ही, व्हीसीआर, सीआरटी टर्मिनल्स किंवा इतर इलेक्ट्रीकल उपकरण सुरु करु नका.

9. व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करून साचलेले पाणी काढण्याचा प्रयत्न करू नका.

10. तळघरातील पाणी बाहेर काढण्याची घाई करु नका. गरजेपेक्षा अधिक कमी वेळात पाण्याचा दबाव कमी झाला तर भिंतींवर ताण वाढू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com