गुरुग्राम : परदेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे सिमकार्डची विक्री; टोळीचा पर्दाफाश

Sim Card
Sim Cardsakal media
Updated on

गुरुग्राम : परदेशी नागरिकांना (Foreigners) अॅक्टीव्ह सिमकार्ड बेकायदेशीरपणे (illegal sim card selling) पुरवणाऱ्या टोळीचा भरारी पथकानं (flying squad) पर्दाफाश केला. याप्रकरणी सेक्टर ५१ मधून एका संशयिताला अटक (suspected arrested) करण्यात आली असून रविंदर सिंग उर्फ समीर (३८) असं त्याचं नाव आहे. आरोपी सिंग बिहारमधील मुजफ्फरपुर येथील नागरिक आहे. कागदपत्रांविनाच सिम कार्डची विक्री करणाऱ्यांच्या भरारी पथकानं मुसक्या आवळ्यात. या गुन्ह्यात सहभागी असणारे दोन आरोपी फरार आहेत. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (Flying squad arrested a culprit selling illegal sim card to foreigners)

Sim Card
पनवेलमध्ये वन्य प्राण्याचा माणसांवर हल्ला; कोल्ह्याने जखमी केल्याचा दावा

भरारी पथकाचे (dsp)इंद्रजीत यादव यांनी दिलेली माहिती अशी की, " आरोपी त्याच्या ग्राहकाची आर्टेमिस रुग्णालयाजवळ प्रतीक्षा करत होता. त्यावेळी भरारी पथकानं त्याला पकडलं. आर्टेमिस रुग्णालयाजवळील गेस्ट हाऊसमध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांना वेगवेगळ्या कंपनीचे सिमकार्ड आरोपी पुरवत होते. याप्रकरणी दोन आरोपी फरार आहेत. नवी दिल्ली येथील जमीर आणि इंद्र कॉलनीतील ललीत अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी वोडाफोन कंपनीचे १४ अॅक्टीव्ह सिमकार्ड, ५२ नॉन अॅक्टीव्ह सिमकार्ड, २० मोबाईल फोन आणि १८५०० रुपये जप्त केले आहेत.

"आरोपी रविंदर सिंग २००५ पासून वझीराबादमध्ये राहतो. परदेशी नागरिकांना एक सिमकार्ड सहाशे ते आठशे रुपयांना बेकायदेशीरपणे तो विकायचा. २०१८ पासून आरोपीकडून बेकायजदेशीर व्यवहार सुरु होता." अशी माहिती भरारी पथकाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. "आरोपींकडून ज्या नागरिकांनी बेकायदेशीरपणे सिमकार्ड खरेदी केले आहेत त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक हरिश यांनी दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com