Morbi Incident : मोदींचा फोटो चांगला यावा म्हणून मध्यरात्री सिव्हील हॉस्पिटलची रंगरंगोटी? विरोधक संतापले!

सिव्हील हॉस्पिटलमधल्या जुन्या टाईल्स, कुलर्स, खराब गोष्टी बदलण्यात आल्या आहेत.
Morbi Incident Hospital
Morbi Incident HospitalSakal

गुजरातच्या मोरबीमध्ये झुलता पूल पडल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यावरुन देशभरात चर्चा सुरू असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या दुर्घटनेतल्या जखमींना भेटण्यासाठी जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जखमींवर उपचार करणारं रुग्णालय चर्चेत आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या रुग्णालयाला भेट देणार म्हणून मध्यरात्रीच या रुग्णालयाची रंगरंगोटी सुरू झाल्याचा दावा करण्यात येतोय. मध्यरात्रीच या रुग्णालयातल्या काही भिंती आणि छत नव्याने रंगवण्यात आलं. नवे पाण्याचे कुलर्सही आणले. याशिवाय जिथे या दुर्घटनेतल्या जखमींना ठेवलेलं आहे, त्यांच्या बेडवरचे बेडशीट्सही तात्काळ बदलण्यात आले आहेत.

रात्री अनेक जण या हॉस्पिटलची साफसफाई करतानाही दिसले. जुन्या खराब झालेल्या गोष्टी टाकून देण्यात आल्या. या सगळ्यावरुन आता काँग्रेससह आम आदमी पक्षानेही पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. काँग्रेसने याविषयी ट्वीट केलं आहे. मोदींचा चांगला फोटो यावा म्हणून तयारी सुरू आहे, असा खोचक टोला काँग्रेसने लगावला आहे. तसंच एवढे लोक मेले तरी हे इव्हेंटबाजी करत असल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे.

तर भाजपाने २७ वर्षांत काम केलं असतं तर मध्यरात्री अशा प्रकारे हॉस्पिटल चकाचक करण्याची गरज भासली नसती, असा टोला आम आदमी पक्षाने फोटो शेअऱ करताना लगावला आहे. मध्यरात्री ही रंगरंगोटी करण्यात आली आहे. शिवाय या सिव्हील हॉस्पिटलमधल्या जुन्या टाईल्सही बदलण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com