"काँग्रेसनं पहिल्यांदाच दलित उमेदवाराला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवलं"

काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी राहुल गांधींच्या निर्णयाचं स्वागत केलं.
Charanjit Singh Channi
Charanjit Singh ChanniSakal

पंजाबमध्ये (Punjab) सध्या विधानसभा निवडणूक (Assembly Elections 2022) तोंडावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावरून संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच काल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लुधियानामध्ये एका सभेत सध्याचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (CM Chranjitsingh Channi) हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं स्पष्ट केलं आहे. त्यावर काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनीही राहुल गांधींच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Charanjit Singh Channi
'सपा'चं सरकार आल्यास Akhilesh Yadav बटाट्यापासून बनवणार दारू
Charanjit Singh Channi
Manipur Assembly Election 2022: भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसकडून १८ सूत्री जाहीरनामा सादर

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी लुधियाना येथे एका सभेत पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली. राहुल गांधी म्हणाले की, पंजाबमध्ये सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) हे काँग्रेसचा मुख्यमंत्री चेहरा असतील. हा माझा नाही तर पंजाबच्या जनतेचा निर्णय आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर आता मल्लिकार्जून खर्गे याबद्दल बोलताना म्हणाले की, देशात प्रथमच काँग्रेसचा उमेदवार दलित समाजातून आहे, ही गोष्ट फार चांगली आहे. पंजाबचे लोकही ते स्वीकारतील, कारण तो एक सामान्य माणूस आहे. ते चांगलं काम करतात. त्यांची निवड करून राहुल गांधी चांगला संदेश दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com