Manipur Assembly Election 2022: भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसकडून १८ सूत्री जाहीरनामा सादर

काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून त्यासाठी काँग्रेसने पाच पक्षांसोबत आघाडी केली आहे
Manipur Assembly Election 2022
Manipur Assembly Election 2022टिम ई सका

देशातील ज्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत, त्यात मणिपूर (Manipur)मध्येही निवडणूकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.काँग्रेस येथे पुन्हा सत्तेत येण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून त्यासाठी काँग्रेसने (Congress) पाच पक्षांसोबत आघाडी केली आहे. त्यात कांग्रेस, सीपीआई, सीपीएम, फॉरवर्ड ब्लॉक, आरएसपी और जनता दल यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मणिपुर प्रोग्रेसिव सेक्युलर एलायंस (MPSA) ने शनिवारी एक १८ सूत्री सामाईक जाहीरनामा लाँच केला जो भाजपला पराभूत करण्यासाठी ‘3D’ (Determination, Dedication, Discipline) दृष्टिकोन देणार आहे.

मणिपुर प्रोग्रेसिव सेक्युलर एलायंसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे की मणिपूरची प्रादेशिक अखंडता आणि ऐतिहासिक सीमा संरक्षित केली जाईल. देशाची संघराज्य रचना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. 18 कलमी जाहीरनाम्यात महिलांना आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या सक्षम करण्याचे म्हटले आहे. नोकरदार महिला, मुली आणि शालेय विद्यार्थ्यांना मोफत सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचे सुध्दा सांगण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह (Okram Ibobi Singh) म्हणाले की, हा जाहीरनामा काळजीपूर्वक तयार करण्यात आलाय कारण आश्वासने पूर्ण न झाल्यास लोक नेत्यांवर विश्वास ठेवणार नाहीत.

काँग्रेस पक्षाने 22 जानेवारी रोजी मणिपूरमधील विधानसभा निवडणुकीसाठी 40 उमेदवारांची नावे जाहीर केली होती, त्यापैकी 12 विद्यमान आमदार आणि 9 माजी आमदार आहेत तर उर्वरित 19 नवीन चेहरे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com