मॉक ड्रिलदरम्यान दुसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जुलै 2018

कोईंबतूर महाविद्यालयात 'एनडीएमए'च्या वतीने मॉक ड्रिल करण्यात आले. यादरम्यान, तरूणीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एन. लोगेस्वरी ही विद्यार्थिनी मॉक ड्रिलमध्ये सहभागी झाली होती. ती दुसऱ्या मजल्यावर असताना एनडीएमएचे प्रशिक्षक टी. आर. अरुमुघम हे प्रशिक्षण देत होते. 

चेन्नई : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीने (एनडीएमए) कोईंबतूर महाविद्यालयात मॉक ड्रिल केले. या मॉक ड्रिलदरम्यान दुसऱ्या मजल्यावरून पडून एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.

कोईंबतूर महाविद्यालयात 'एनडीएमए'च्या वतीने मॉक ड्रिल करण्यात आले. यादरम्यान, तरूणीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एन. लोगेस्वरी ही विद्यार्थिनी मॉक ड्रिलमध्ये सहभागी झाली होती. ती दुसऱ्या मजल्यावर असताना एनडीएमएचे प्रशिक्षक टी. आर. अरुमुघम हे प्रशिक्षण देत होते. 

दरम्यान, याबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की लोगेस्वरी ही उडी मारण्यास इच्छुक नव्हती. मात्र, तिच्या प्रशिक्षकाने तिला ढकलले आणि त्यामध्येच तिच्या डोक्याला मार लागला. या घटनेनंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

Web Title: Forced to jump off second floor girl dies during mock drill in a Coimbatore college