राजकीय फायद्यासाठी माझा बळीचा बकरा : तेजप्रताप

Forced to marry for political benefits, says Lalu Prasad’s son Tej Pratap
Forced to marry for political benefits, says Lalu Prasad’s son Tej Pratap

पटणा : "राजकीय फायद्यासाठी मला माझ्या कुटुंबिय आणि पक्षाकडून बळीचा बकरा बनवण्यात आले. लग्नासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता'', असे बिहारचे माजी मंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी सांगितले. 

तेजप्रताप यादव यांनी त्यांची पत्नी ऐश्वर्या रॉय यांच्यापासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर तेजप्रताप यादव म्हणाले, ''आमच्यामध्ये कोणत्याही बाबी जुळत नाहीत. आम्ही दोघेही अत्यंत वेगळ्या अशा घटकातून आलो आहोत. आमची संस्कृती पूर्णपणे वेगळी आहे. मी लग्नासाठी कधीही तयार नव्हतो. मी लग्नापूर्वी माझ्या भावना माझा भाऊ तेजस्वी आणि बहिणीला सांगितल्या होत्या. पण कोणीही माझे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही''. 

दरम्यान, तेजप्रताप हे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार असून, बिहारचे माजी कॅबिनेट मंत्री आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com