लग्नासाठी धर्मांतर चुकीचं, कोर्टानं दिलं जोधा-अकबरचं उदाहरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

high court

लग्नासाठी धर्मांतर चुकीचं, कोर्टानं दिलं जोधा-अकबरचं उदाहरण

लखनौ : फक्त लग्नासाठी धर्मांतर करणे चुकीचे आहे. धर्म हा आस्थेचा विषय आहे, असा निर्णय उत्तर प्रदेशातील अलहाबाद उच्च न्यायालयाने (allahabad high court) दिला. लव जिहादच्या (love jihad case) एका प्रकरणावर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने मुघल बादशाह अकबर आणि त्यांची पत्नी जोधाबाई यांचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले.

हेही वाचा: ‘छळ ही आत्महत्येसाठी चिथावणी नाही’

जबरदस्तीने कोणाचे धर्मांतर केल्यास त्या धर्माबद्दल त्या व्यक्तीला आस्था नसते. असा निर्णय हा दबावाखाली घेतला जातो. फक्त लग्नासाठी कोणाचे धर्मांतर करणे चुकीचे असून याला कुठलीही संवैधानिक मान्यता नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी बादशाह अकबर आणि जोधाबाई यांचे उदाहरण देखील न्यायालयाने दिले. अकबरने जोधाबाईंसोबत कुठलेही धर्मांतर न करता लग्न केले होते. दोघांनीही एकमेकांच्या धर्माचा सन्मान केला होता. तसेच धार्मिक भावनांचा आदर देखील केला होता. त्यामुळे दोघांच्याही नात्यामध्ये धर्म कधीच आडवा आला नाही, असेही न्यायालयाने म्हटले.

नेमक्या कोणत्या प्रकरणावर होती सुनावणी?

एटा जिल्ह्यातील जावेद नावाच्या व्यक्तीवर एका हिंदू मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न केल्याचा आरोप आहे. मुलीने देखील तसा बयान दिला आहे. त्यामुळे जावेदला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरच मंगळवारी सुनावणी घेण्यात आली असून न्यायालयाने त्याची जामिन याचिका रद्द केली आहे.

Web Title: Forcefully Religion Conversion Only For Marriage Is Wrong Says Allahabad High Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Allahabad high court