‘छळ ही आत्महत्येसाठी चिथावणी नाही’

न्या. एल. नागेश्‍वरराव आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली.
supreme court
supreme courtsakal media

नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीने केवळ छळ केला म्हणून तिने आत्महत्येसाठी चिथावणी दिली असे म्हणता येणार नाही, असे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) यासाठी छळ करणाऱ्या व्यक्तीकडून तसे कृत्य होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकरणात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम-३०६ अंतर्गत अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. असेही आजच्या सुनावणीवेळी स्पष्ट करण्यात आले. (Persecution not a provocation suicide supreme court)

न्या. एल. नागेश्‍वरराव आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली. चिथावणी देणाऱ्या व्यक्तीनेही समोरच्या व्यक्तीसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच ठेवला नसेल किंवा तशी परिस्थिती निर्माण केली असेल तरच त्या व्यक्तीवर या कलमांतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.

supreme court
‘पाळत’ प्रकरणाची स्वतंत्र चौकशी हवी

काय होते प्रकरण?

एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. पत्नीच्या त्रासामुळे आपण हे कृत्य करत आहोत असे तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठ्यांत म्हटले होते. याबाबत आज सुनावणी पार पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com