ALH Dhruv : इमर्जन्सी लँडिंगच्या घटनेनंतर सैन्याने 'धृव' हेलिकॉप्टरचा वापर काही काळासाठी थांबवला

ALH हेलिकॉप्टर भारतीय तटरक्षक दलासह लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही संरक्षण दलांद्वारे चालवले जातात.
AHL Dhruv HeliCopter
AHL Dhruv HeliCopterSakal

दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या किनारपट्टीवर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, संरक्षण दलांनी एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरचा वापर थांबवला आहे. जोपर्यंत या अपघाताचं कारण सापडत नाही आणि खबरदारीच्या तपासण्या केल्या जात नाहीत, तोवर याचा वापर होणार नाही.

ALH हेलिकॉप्टर भारतीय तटरक्षक दलासह लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही संरक्षण दलांद्वारे चालवले जातात. "मुंबई किनारपट्टीवरील घटनेचे कारण शोधून काढेपर्यंत आणि खबरदारीच्या तपासण्या केल्या जाईपर्यंत वापर थांबवण्यात आला आहे," असं संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले.

AHL Dhruv HeliCopter
Lalu Prasad Yadav : "माझी नातवंडं, गरोदर सुनेला ईडीने..."; छाप्यानंतर लालू प्रसाद यादव संतापले!

ALH ध्रुव हेलिकॉप्टरचा वापर भारतीय संरक्षण दलांद्वारे वाहतुकीसह अनेक कारणांसाठी केला जातो."एचएएलने आधीच पावले उचलली आहेत आणि हेलिकॉप्टरचा ताफा पूर्णपणे कार्यान्वित आहे याची खात्री करण्यासाठी ग्राहकांशी पूर्ण सहकार्याने काम करेल," असंही HAL अधिकाऱ्यांनी ANI ला सांगितले.

AHL Dhruv HeliCopter
Pune Crime : IT कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने मॉलमध्ये मारला डल्ला; २-३ लाखाचं सोनं चोरलं

ALH ध्रुव हे तिन्ही सैन्याने हाती घेतलेल्या हेलिकॉप्टर मोहिमेतील एक महत्त्वाचा भाग बनले आहे. हे हेलिकॉप्टर्स वेगवेगळ्या भागांमध्ये तैनात आहेत. संरक्षण अधिकार्‍यांनी सांगितले की ते लवकरच एएलएच ध्रुवचा वापर पुन्हा सुरू करतील अशी आशा आहे.

दोन दिवसांपूर्वी, एक भारतीय नौदलाच्या एएलएच ध्रुवला मुंबईपासून नियमित उड्डाण मोहिमेवर असताना अचानक हे हेलिकॉप्टर अचानक खाली येऊ लागलं. इंधनाची शक्तीही कमी झाली. नौदलाने सांगितले की पायलटने पाण्यावर नियंत्रितपणे हेलिकॉप्टर थांबवलं आणि कर्मचारी हेलिकॉप्टरमधून सुरक्षितपणे बाहेर पडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com