परकीय चलन घोटाळा : खासगी कंपन्यांच्या 2 संचालकांना 27 वर्षांची शिक्षा, 85 कोटींचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Foreign Exchange Scam

या घोटाळ्यात एकूण 870 कोटी रुपयांची लोकांची फसवणूक झाल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे.

परकीय चलन घोटाळा : खासगी कंपन्यांच्या 2 संचालकांना 27 वर्षांची शिक्षा, 85 कोटींचा दंड

Foreign Exchange Scam : आजपासून सुमारे 12 वर्षांपूर्वी झालेल्या एका मोठ्या घोटाळ्यात न्यायालयानं कंपन्या आणि त्यांच्या संचालकांना कठोर शिक्षा सुनावलीय. भरघोस परतावा देऊन घोटाळा केल्याच्या या प्रकरणात न्यायालयानं (Court) या प्रकरणाशी संबंधित दोन कंपन्यांच्या संचालकांना 27 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, कंपन्यांसह संचालकांना सुमारे 172 कोटी रुपयांचा दंडही ठोठावलाय.

या घोटाळ्यात एकूण 870 कोटी रुपयांची लोकांची फसवणूक झाल्याचं सीबीआयचं (CBI) म्हणणं आहे. या घोटाळ्यात फॉरेक्स ट्रेडिंगच्या (Forex Trading) नावाखाली लोकांना जास्त नफा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयानं के मोहनराज आणि कमलवल्ली या खासगी कंपन्यांच्या दोन संचालकांना 27 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलीय. यासोबतच दोन संचालकांना प्रत्येकी 42.76 कोटी रुपयांचा, तर 3 खासगी कंपन्यांना प्रत्येकी 28.74 कोटी रुपयांचा म्हणजे एकूण 172 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. एजन्सीनं सांगितलं की, या प्रकरणात हे सिद्ध झालंय की दोषींनी बनावट योजनेच्या मदतीनं 870 कोटी रुपयांची फसवणूक केलीय.

काय आहे संपूर्ण प्रकरण

सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, दोषींनी जुलै 2008 ते सप्टेंबर 2009 दरम्यान अनेक बनावट योजनांद्वारे लोकांकडून पैसे गोळा केले होते, ज्यामध्ये त्यांना कमी वेळेत जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवलं होतं. या प्रकरणी तक्रारी आल्यानंतर सीबीआयनं जून 2011 मध्ये गुन्हा दाखल केला होता. संस्थेनं या वर्षी ऑक्टोबरमध्ये आरोपपत्र दाखल केलं. त्यानंतर ट्रायल कोर्टानं या प्रकरणात दोन्ही आरोपी आणि तीन कंपन्यांना दोषी ठरवलंय.

टॅग्स :CBICourtCBI inquiry