‘सिंगापूर स्ट्रेन’वरुन परराष्ट्र मंत्रालयाचा केजरीवालांवर निशाणा

कोरोना विषाणूबाबतच्या संबंधाचा वाराही लागायला नको या दृष्टीने जगातील देश खबरदारी घेत आहेत.
s jaishankar
s jaishankarSakal

नवी दिल्ली - सिंगापूरमध्ये (Singapore) आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन (Corona New Strain) लहान मुलांसाठी (Child) घातक (Danger) आहे, असा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्यावर सिंगापूर सरकारने त्याबाबत तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर केंद्र सरकारने प्रकरण झुरळासारखे झटकून टाकले. भारतातील एखाद्या मुख्यमंत्र्यांचे मत हे संपूर्ण देशाचे मत ठरत नाही आणि असे वक्तव्य करण्याची दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची पात्रताही नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने (Foreign Ministry) स्पष्ट केले. (Foreign Ministry Targets Kejriwal from Singapore Strain)

दरम्यान, आम आदमी पक्षाने, देशाच्या सरकारला देशातील बालकांची नव्हे तर सिंगापूरची चिंता आहे, असे म्हणून टीकेची झोड उठवली.

कोरोना विषाणूबाबतच्या संबंधाचा वाराही लागायला नको या दृष्टीने जगातील देश खबरदारी घेत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘कोरोनाचा भारतात आढळलेला नवा विषाणू’ असे वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेकडून आल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर भारताने त्यावर असाच तीव्र आक्षेप घेतला होता. कोरोनाचा हा नवा सिंगापुरी स्ट्रेन भारतात तिसऱ्या लाटेच्या रूपात येऊ शकतो, असा इशाराही केजरीवाल यांनी दिला, मात्र त्यांचे हे ट्विट आज वादाचा विषय ठरले. कारण सिंगापूरने केजरीवाल यांच्या वक्तव्याची दखल घेऊन भारतीय उच्चायुक्तांना बोलावून घेत आक्षेप नोंदवला. त्यानंतर भारताने खुलासा केला व परराष्ट्र मंत्रालयाचे वक्तव्य आले. इतकेच नव्हे तर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही खुलासा करून एका मुख्यमंत्र्यांचे मत हे देशाचे मत असू शकत नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर संतापलेल्या ‘आप’ने निशाणा साधला. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी, केंद्र सरकारला देशातील मुलांची नव्हे तर सिंगापूरची जास्त काळजी वाटते, असा उलटवार केला.

s jaishankar
मोदी सरकार आणणार नवं चॅनेल; जागतिक पातळीवर दुमदुमणार भारताचा आवाज

सिंगापूरची नाराजी

केजरीवाल यांच्या वक्तव्यावर सिंगापूरने आज परराष्ट्र मंत्रालयात तीव्र नाराजी आणि आक्षेप नोंदवला. त्यावर मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करून सांगितले की, सिंगापूर सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. भारतीय उच्च आयोगाने सिंगापूर सरकारला सांगितले आहे, की कोविड व्हेरिअॅंट्स किंवा मुलकी विमान वाहतूक धोरणाबद्दल वक्तव्य करण्याची दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची पात्रताच नाही.

भारत आणि सिंगापूर यांच्यातील दीर्घ परस्पर सहकार्य आणि भागीदारीला काही लोकांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे नुकसान पोहोचू शकते. एका मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे साऱ्या भारताचे वक्तव्य होऊ शकत नाही, हे मी स्पष्ट करतो.

- एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

कोरोना विषाणूबाबत चुकीची माहिती पसरल्यानंतर त्याचे खंडन करण्यासाठी भारत सरकारने सुस्पष्ट प्रमाणपत्र दिले. याबद्दल भारत सरकारला दाद देतो. जयशंकर यांनी दिलेल्या ग्वाहीमुळे समाधान झाले आहे.

- सायमन वोंग, सिंगापूरचे उच्चायुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com