परराष्ट्र सचिव जयशंकर यांना मुदतवाढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

जयशंकर यांनी अमेरिका व व चीनमधील भारतीय राजदूत याआधी काम केले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांचे निकटवर्तीय मानले जातात...

नवी दिल्ली - भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. परराष्ट्र सचिव म्हणून दोन वर्षे म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर जयशंकर हे या महिन्यात निवृत्त होणार होते. मात्र त्यांना आता जानेवारी, 2018 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

जयशंकर यांनी 29 जानेवारी, 2015 रोजी परराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली होती. जयशंकर यांनी अमेरिका व व चीनमधील भारतीय राजदूत याआधी काम केले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांचे निकटवर्तीय मानले जातात.

जयशंकर यांच्यानंतर परराष्ट्र सचिव पदाच्या स्पर्धेमध्ये सुजाता मेहता, अमर सिन्हा, नवतेज सरना, अनिल वधवा आणि रणजित राय या ज्येष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची नावे चर्चेमध्ये होती. जयशंकर यांच्या निवृत्तीस दोन दिवस राहिले असतानाच परराष्ट्र सचिवपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी सूत्रे हाती घेतली असतानाच जयशंकर यांच्या अमेरिकेतील अनुभवाचा सरकारला फायदा होईल, असे मानले जात आहे.

Web Title: Foreign secretary S Jaishankar gets one-year extension