AAP : सत्येंद्र जैन तिहार जेलच्या बाथरुममध्ये कोसळले, प्रकृती खालावल्याने LNJP मध्ये हलवलं

Satyendra Jain in Tihar Jail
Satyendra Jain in Tihar Jailesakal

Satyendra Jain in Tihar Jail : दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे गुरुवारी तिहार जेलमध्ये बाथरुममध्ये कोसळले आहेत. चक्कर आल्याने ते कोसळल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर त्यांना डीडीयू रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. तिथे त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलेलं आहे. आता त्यांना दिल्लीतल्या एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे.

मागच्या एका आठवड्यापासून जैन यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. यापूर्वीदेखील ते बाथरुममध्ये कोसळले होते. त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झालेली होती. आता पुन्हा तिहार जेलमधील बाथरुममध्ये कोसळल्याने जैन यांची प्रकृती खालावली आहे.

Satyendra Jain in Tihar Jail
Hyderabad Crime: पार्किंगमध्ये झोपलेल्या कामगार महिलेच्या चिमुकलीला एसयुव्हीनं चिरडलं! हैदराबादेतील हृदयद्रावक घटना

तिहार तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. जैन हे बाथरूममध्ये पडले होते. त्यानंतर डॉक्टरांनी जैन यांची तपासणी केली असून त्यांची प्रकृती खालावली होती. सध्या त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जैन यांनी पाठ, पाय आणि खांदे दुखत असल्याची तक्रार केली होती.

तिहार प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे, त्यांच्या सर्व चाचण्या केल्या जातील. त्यांना मणक्याचा त्रास होत आहे. याआधीही सोमवारी त्यांना मणक्याच्या तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे.

Satyendra Jain in Tihar Jail
Maharashtra HSC Result 2023: प्रतीक्षा संपली बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पहा रिझल्ट

दरम्यान, सततच्या आजारपणामुळे सत्येंद्र जैन यांचं वजन ३५ किलोने कमी झालेलं आहे. तरुंग बंदिस्त असल्याने उदास आणि एकटे वाटत असल्याची तक्रार जैन यांनी प्रशासनाकडे कोली होती. आज बाथरुममध्ये कोसळल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com