हॅलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी माजी एअरफोर्स प्रमुखांना अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- अगुस्ता वेस्टलँड कंपनीबरोबर झालेल्या हॅलिकॉप्टर खरेदीच्या 3600 कोटींच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) माजी हवाईदल प्रमुख एसपी त्यागी यांना आज (शुक्रवार) अटक केली.

सन 31 डिसेंबर 2005 रोजी एसपी त्यागी हे हवाईदल प्रमुख झाले होते तर 2007 मध्ये ते निवृत्त झाले होते. त्यागी यांची सीबीआयने यापुर्वी एकदा चौकशी केली होती. 1 जानेवारी 2014 रोजी भारत सरकारने अगुस्ता वेस्टलँड कंपनीबरोबर करार रद्द केला होता. अगुस्ता कंपनीकडून भारतीय हवाई दलाला 12 हॅलिकॉप्टर्स पुरवण्यात येणार होती. करारातील अटींचे उल्लंघन आणि लाच दिल्याचा आरोप झाल्यामुळे हा करार रद्द करण्यात आला. व्हीव्हीआयपी व्यक्तींसाठी हे हॅलिकॉप्टर्स खरेदी करण्यात येणार होते.
 
एसपी त्यागी व त्यांच्या चुलतबंधुंनी 2004-05च्या सुमारास मध्यस्थामार्फत लाच स्वीकारल्याचे सीबीआयच्या प्राथमिक तपासातच स्पष्ट झाले होते. वकील गौतम खेतान व संजीव त्यागी यांनाही सीबीआयने अटक केली. तिघांवर लाच स्वीकारल्याचा आरोप आहे.

Web Title: Former Air Force chief SP Tyagi arrested in AgustaWestland chopper deal case