'नरेंद्र मोदी म्हणजे, हिंदू जिन्ना', पाहा कोणी केली टीका!

टीम ई-सकाळ
मंगळवार, 7 जानेवारी 2020

भाजप किंवा आरएसएस जे हिंदुत्व देशावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत, ते भारतीयांना मान्य नाही हे सीएए आणि एनआरसी विरोधात देशभरात आंदोलन होत आहेत.

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसीला देशभरातून होत असलेला विरोध, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेला भ्याड हल्लाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुम गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलंय. मोदींचा उल्लेख त्यांनी हिंदू जिन्ना, असा केलाय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय म्हणाले, तरुण गोगई?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे द्वि राष्ट्र सिद्धांत फॉलो करत आहेत. या सिद्धांतामुळचं भारताचे भारत-पाकिस्तान असे दोन तुकडे झाले. त्यामुळं मोदी हे तर हिंदू जिन्ना आहेत, अशी टीका तरुण गोगोई यांनी केलीय. रविवारी जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा दडपशाहीचे उदाहरण आहे. ही दडपशाही देशाला पुढे खूप घातक ठरणार आहे, असा दावाही गोगोई यांनी केलाय. गोगोई म्हणाले, 'भाजप किंवा आरएसएस जे हिंदुत्व देशावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत, ते भारतीयांना मान्य नाही हे सीएए आणि एनआरसी विरोधात देशभरात आंदोलन होत आहेत.'

आणखी वाचा : फ्री काश्मीर पोस्टरवरून फडणवीस तोंडघशी, जयंत पाटील यांची टीका

असले हिंदुत्व नकोच
ते म्हणाले, 'पंतप्रधान आमच्या पाकिस्तानची भाषा करत असल्याचा आरोप करतात. पण, मुळात पंतप्रधान मोदींनी त्यांना स्वतःला पाकिस्तानसारख्या पातळीवर आणून ठेवले आहे. ते मोहम्मद अली जिन्ना यांची थिअरी फॉलो करत आहे. आम्ही हिंदू आहोत. पण, आम्हाला आमच्या देशाला हिंदू राष्ट्र करण्यात कोणताही रस नाही. सध्या ज्यांनी देशात आंदोलन उभारलंय. त्यातले बहुतांश हिंदू आहेत. ते आंदोलनात जखमी झाले आहेत. काहींचा बळी गेलाय. त्यांना भाजप आणि आरएसएसला अपेक्षित असणार हिंदुत्व नको आहे.' जेएनयू विद्यापीठा रविवारी रात्री झालेला हल्ला हा, देशाच्या एकात्मतेला छेद देणार आहे, असंही गोगोई यांनी म्हटलंय. मोदी सरकार अतिशय उद्धट आहे आणि नवा नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, असा आरोप गोगोई यांनी केलाय. आगामी विधानसभा निवणुकीत आसाममधील 126 पैकी 25 जागाही भाजपला मिळणार नाहीत, असा दावा गोगोई यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former assam cm tarun gogoi statement modi hindu jinnah