देवेंद्रजी, तुम्ही सत्तेसह स्वनियंत्रणही गमाविले; जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 January 2020

वेंद्रजी, ‘काश्मीर मुक्त करा’ याचा अर्थ काश्मीर भेदभावापासून, नेटवर्कवरील बंदीपासून आणि केंद्रीय अंकुशापासून मुक्त करा.

मुंबई : मुंबईतील आंदोलनादरम्यान 'फ्री काश्मीर'चे पोस्टर झळकल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केल्यानंतर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसजी तुम्ही सत्तेसह स्वनियंत्रणही गमाविले, असा टोला मारला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या नाकाखाली लागणारे ‘फ्री काश्मीर’चे फलक कसे खपवून घेतात? असा प्रश्न करणारे ट्विट फडणवीस यांनी सोमवारी रात्री केले होते. या ट्विटला जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून जनतेची दिशाभूल कशी करु शकतात, असा प्रश्न आपल्याला पडत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. 

'फ्री काश्मीर'वरून फडणवीसांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत म्हटले आहे, की देवेंद्रजी, ‘काश्मीर मुक्त करा’ याचा अर्थ काश्मीर भेदभावापासून, नेटवर्कवरील बंदीपासून आणि केंद्रीय अंकुशापासून मुक्त करा. तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून तिरस्कार निर्माण करत आहेत, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, यावर माझा विश्वासच बसत नाही. सत्ता गमावल्यामुळे हे होत आहे की तुम्ही स्वनियंत्रण गमावून बसला आहात?.

'फ्री काश्मीरचे पोस्टर घेऊन थांबलेल्या 'त्या' मुलीनेच सांगितले....

त्यापूर्वी फडणवीस यांनी सरकारवर टीका करत म्हटले होते, की ‘तुमची दया येते! आता फुटीरतावादी वृत्तीला सरकारी वकील मिळाला. जयंतराव, हे वोट बँकेचं राजकारण तुमच्याकडून अपेक्षित नाही. काश्मीर आधीच भेदभावापासून मुक्त आहे. फक्त सुरक्षेच्या कारणास्तव काही दशकांपासून निर्बंध आहेत. सरकारमध्ये असो किंवा विरोधीपक्षात, आमचं एकच तत्त्व ‘राष्ट्र सर्वप्रथम’.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Jayant Patil answer to Devendra Fadnavis on Free Kashmir