Post Covid complications : आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई व्हेंटिलेटरवर!

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 22 November 2020

राज्याचे आरोग्यमंत्री बिस्व सरामा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी श्वसनाचा त्रास अधिक जाणवल्यामुळे त्यांची तब्येत अधिक बिघडली. गोगाई पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. पुढील 48-72 तास खूप महत्त्वाचे असून त्यांच्यावर डायलिसिस ही करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गोगाईंना उपचारासाठी अन्य ठिकाणी हलवण्यासंदर्भातील वृत्त आरोग्यमंत्र्यांनी फेटाळले आहे. 

गुवाहाटी : आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगाई यांची तब्येत चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गोगोई (86) श्वसनाचा त्रास आणि काही शरिरातील असह्य थकवा यामुळे त्यांना गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय (जीएमसीएच) मध्ये दाखल करण्यात आले आहे. 2 नोव्हेंबरपासून त्यांच्यावर उपचार सुरु असून सध्याच्या घडीला त्यांची परिस्थिती नाजूक असल्याची माहिती मिळत आहे. 

जबाबदारी स्वीकारणारेच यशस्वी ठरतात; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र

राज्याचे आरोग्यमंत्री बिस्व सरामा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी श्वसनाचा त्रास अधिक जाणवल्यामुळे त्यांची तब्येत अधिक बिघडली. गोगोई पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. पुढील 48-72 तास खूप महत्त्वाचे असून त्यांच्यावर डायलिसिस ही करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गोगाईंना उपचारासाठी अन्य ठिकाणी हलवण्यासंदर्भातील वृत्त आरोग्यमंत्र्यांनी फेटाळले आहे. 

Corona Update : अदर पुनावालांनी सांगितली, चांगली व्हॅक्सिन कोणती?

तीन वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेल्या गोगोई यांना कोरोनाची लागण झाली होती. 25 ऑक्टोबरला कोरोनातून सावरल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.  25 ऑगस्ट रोजी गोगोई यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. दोन महिने रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र आता पोस्ट कोविडमुळे त्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Assam CM Tarun Gogois health condition deteriorates due to post Covid complications