जबाबदारी स्वीकारणारेच यशस्वी ठरतात; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

ज्यांच्या जगण्यात ‘जबाबदारीची जाणीव’ (सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी) असते तेच काही तरी करून दाखवतात व यशस्वीही ठरतात. हीच भावना जीवनात पुढे संधींच्या जाणिवेला (सेन्स ऑफ अपॉर्च्युनिटी) जन्म देते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. दबावाच्या भावनेत (सेन्स ऑफ बर्डन) जे जगतात ते आयुष्यात अयशस्वीच ठरतात, असेही मोदींनी नमूद केले.

नवी दिल्ली - ज्यांच्या जगण्यात ‘जबाबदारीची जाणीव’ (सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी) असते तेच काही तरी करून दाखवतात व यशस्वीही ठरतात. हीच भावना जीवनात पुढे संधींच्या जाणिवेला (सेन्स ऑफ अपॉर्च्युनिटी) जन्म देते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. दबावाच्या भावनेत (सेन्स ऑफ बर्डन) जे जगतात ते आयुष्यात अयशस्वीच ठरतात, असेही मोदींनी नमूद केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या पदवी प्रदान समारंभाला पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. विद्यापीठातील मोनोक्रिस्टलाइन सोलर फोटो व्होल्टाइक पॅनलच्या ४५ मेगावॉट वीजनिर्मिती उत्पादन प्रकल्पाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. भारताने कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष ३० ते ३५ टक्के ठेवले असून देशाला येत्या दशकात एकूण गरजेच्या ४ टक्‍क्‍यांपर्यंत नैसर्गिक व अपारंपरिक ऊर्जानिर्मिती करण्याचे प्रयत्न आहेत, असे मोदींनी सांगितले. 

Corona Update : अदर पुनावालांनी सांगितली, चांगली व्हॅक्सिन कोणती?

पंतप्रधानांनी सांगितले की, २१ व्या शतकातील युवकांनी कोरी पाटी घेऊनच अग्रेसर होण्यास सुरवात करावी. विशिष्ट ‘कमिटमेंट’सह पुढे गेले तर तुम्ही स्वतःमध्येच अफाट ऊर्जेचा अनुभव घ्याल. जबाबदारीचा भाव व जीवनाचे निश्‍चित उद्दिष्ट या दोन रुळावरूनच वेगाने तुमची गाडी धावू शकते. कोणतेही काम करा, पण तुमचा हेतू स्वच्छ व निर्मळ असला पाहिजे. ‘सध्याचे काही बदलणार नाही,’ हीच भावना कवटाळून बसलेल्यांच्या मनातून तुमच्या पिढीला ती हद्दपारही करायची आहे, असेही मोदींनी युवापिढीला सांगितले.

कानात हेडफोन घालून ट्रॅकवर चालणाऱ्या दोघांना ट्रेनची धडक; मृतदेहांचे झाले तुकडे 

पंतप्रधान मोदी उवाच...

  • माणसाच्या अपार इच्छांमधूनच संकल्पाची अपरंपार शक्ती असते
  • समस्या व संकटे काय आहेत त्यापेक्षाही तुमचे उद्दिष्ट कसे आहे, त्याच्या साध्यतेसाठी तुमची योजना कशी आहे, तुमची कष्टाची किती तयारी आहे या गोष्टींवरच यश अवलंबून
  • अपयश आले तरी आव्हानांचा मुकाबला करण्याची जिद्द हरवता कामा नये

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only those who accept responsibility are successful narendra modi student