बंदुकीचा धाक दाखवून भाजपच्या माजी आमदाराचा सुनेवरच बलात्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदारानेच सुनेवर बलात्कार केल्याची धक्कायदायक घटना समोर आली आहे. सुनेनच तशी तक्रार पोलिसात दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांनी भाजपच्या माजी आमदारांविरोधात कथित बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. रघुवेन्द्र शौकीन असे या आमदाराचे नाव असून नांगलोई विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी दोनवेळा आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. 

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदारानेच सुनेवर बलात्कार केल्याची धक्कायदायक घटना समोर आली आहे. सुनेनच तशी तक्रार पोलिसात दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांनी भाजपच्या माजी आमदारांविरोधात कथित बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. रघुवेन्द्र शौकीन असे या आमदाराचे नाव असून नांगलोई विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी दोनवेळा आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. 

31 डिसेंबर 2018 च्या पार्टीवेळी सासऱ्याने हे लाजीरवाणे कृत्य केले असल्याचे सुनेने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. 31 डिसेंबरची पार्टी संपल्यानंतर 1 जानेवारी 2019 रोजी मध्यात्री बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला, अशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

आता पर्यंत केवळ माझा संसार वाचावा म्हणून मी यापूर्वीही कुठलीही तक्रार दिली नसल्याचे स्पष्टीकरण पिडीतेने दिले आहे. सीएडब्लूकडेही यापूर्वीच घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली असल्याचेही पिडीत महिलेने सांगितले आहे.

दरम्यान, 31 डिसेंबर 2018 ला एका हॉटेलमध्ये सर्व कुटुंबिय आणि नातेवाईकासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टी झाल्यानंतर साधारण 12.30 वाजता आम्ही सर्वजण घरी निघालो होतो. माझे पती त्यांच्या मित्रांसमेवत निघून गेले, त्यामुळे मीही माझ्या खोलीत झोपायला गेले. त्याचवेळी, मध्यरात्री 1.30 वाजता माझ्या सासऱ्यांनी मला आवाज दिला. तुला काहीतरी सांगायचे आहे असे म्हणत मला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. दारूच्या नशेत मला नको तिथे स्पर्श करु न बंदुकीचा धाक दाखवत मला आणि माझ्या भावाला ठार मारण्याची धमकी देत त्यांनी माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडिताने तक्रारीत केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former BJP MLA booked for raping, threatening daughter-in-law