भाजपचा माजी आमदार बलात्कार प्रकरणात दोषी; 19 डिसेंबरला शिक्षा

वृत्तसंस्था
सोमवार, 16 डिसेंबर 2019

सेंगर याने पहिले संबंधित मुलीचे अपहरण केले व नंतर तिच्यावर बलात्कार केला. घटना घडली तेव्हा ती मुलगी अल्पवयीन होती. न्यायालयाने 9 ऑगस्ट रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हे निश्‍चित केले होते. अखेर न्यायालयाने आज त्याला दोषी ठरविले आहे.

नवी दिल्ली : भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेला आमदार कुलदीप सेंगर याला दिल्लीतील तिसहजारी न्यायालयाने उन्नावमध्ये एका युवतीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी दोषी ठरविले आहे. त्याला 19 डिसेंबरला शिक्षा सुनाविण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उन्नावमधील ही बलात्काराची घटना 2017मध्ये घडली होती. या प्रकरणाची सुनावणी या वर्षी पाच ऑगस्टपासून दररोज घेण्यात येत होती. मुळात हा खटला लखनौमध्ये दाखल करण्यात आला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला दिल्लीला वर्ग करण्यात आला. न्यायालयाने आज या प्रकरणी झालेल्या सुनावणीत त्याला दोषी ठरवत केंद्रीय अन्वेषण विभागालाही (सीबीआय) दिरंगाई केल्याबद्दल फटकारले आहे.

जामीया इस्लामिया विद्यापीठाबाहेर जाळपोळ, बस पेटवल्या; 'कॅब' विरोधाला हिंसक वळण

सेंगर याने पहिले संबंधित मुलीचे अपहरण केले व नंतर तिच्यावर बलात्कार केला. घटना घडली तेव्हा ती मुलगी अल्पवयीन होती. न्यायालयाने 9 ऑगस्ट रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हे निश्‍चित केले होते. अखेर न्यायालयाने आज त्याला दोषी ठरविले आहे. विरोधी पक्षांकडून भाजपवर या प्रकरणी टीका करण्यात आल्यानंतर भाजपमधून त्याची हकालपट्टी करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former BJP MLA Kuldeep Singh Sengar has been found guilty in the Unnao rape case